शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

"जनतेने निवडणुकांत काँग्रेसला विरोधी पक्षनेता बनू देण्याच्याही लायकीचं ठेवलं नाही पण..."

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 7:19 PM

Rahul Gandhi In Assam : CAA लागू करु देणार नसल्याचं राहुल गांधींनी केलं होतं वक्तव्य. भाजप नेत्यानं लगावला राहुल गांधींना टोला.

ठळक मुद्देCAA लागू करु देणार नसल्याचं राहुल गांधींनी केलं होतं वक्तव्यआसाम रिमोटनं चालत नाही, राहुल गांधींचं वक्तव्य

येत्या काही दिवसांमध्ये आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडू शकतात. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. भाजपनं एकीकडे जोर लावण्यास सुरूवात केली आहे, तर दुसरीकडे आता काँग्रेसही रिंगणात उतरली आहे. राहुल गांधी यांनि शिवसागर जिल्ह्यातील शिवनगर बोर्डिंग फिल्डमधून पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली. तसंच त्यांनी CAA लागू करु देणार नसल्याचंही सभेदरम्यान म्हटलं. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींना जोरदार टोला लगावला आहे. "देशाच्या जनतेनं गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेसला विरोधी पक्षनेता बनू देण्याच्याही लायकीची ठेवली नाही. पण त्यांच्या डोक्यातून अजूनही आपण सत्ताधारी असल्याचा भ्रम जात नाही. राहुल गांधी केंद्र सरकारला देशात CAA लागू न करू देण्याचे न पेलणारे आव्हान देणारे तुम्ही कोण?," असं म्हणत भातखळकर यांनी राहुल गांधींना टोला लगावला. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राहुल गांधींवर निशाणा साधला.काय म्हणाले होते राहुल गांधी?"अवैध इमिग्रेशनचा मुद्दा आहे. परंतु आसामच्या लोकांमध्ये तो सोडवण्याची क्षमता आहे. आसामला नुकसान झालं तर देशाचंही नुकसान होतं. काहीही झालं तर CAA येथे कधीही लागू होणार नाही. हम दो हमारे दो असलेल्या सरकारनं ऐकून घ्यावी या ठिकाणी कधीही CAA लागू होणार नाही," असं राहुल गांधी म्हणाले. "हम दो हमारे दो आणि बाकी सर्वांनी मरून जावं. हम दो हमारे दो... आसाम चालवत आहेत. आसाममध्ये जा, आग लावा, आणखी जे काही आसाममध्ये आहे ते लूटा. जे या ठिकाणी द्वेष पसरवण्याचं काम करतील त्यांना इकडची जनता आणि काँग्रेस मिळून योग्य धडा शिकवू," असंही ते म्हणाले. "काँग्रेस छोटे व्यापारी, कष्टकरी आणि गरीब लोकांचा पक्ष आहे, आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा एक गोष्ट होईल. जो द्वेष पसरवला जात आहे तो कमी होईल. आम्ही सर्व धर्म आणि जातीच्या लोकांचं संरक्षण करू. २००४ ते २०१४ या काळात भारताचा झपाट्यानं आर्थिक विकास झाला. कोट्यवधी लोकांना आम्ही गरीबीतून बाहेर काढलं. आम्ही तरूणांमधील भीती घालवून टाकू. आसाममधील बेरोजगारी आम्ही संपवू," असंही ते म्हणाले. रिमोटनं आसाम चालणार नाही"रिमोट हा टीव्ही चालवू शकतो परंतु आसाम चालवू शकत नाही. तुमचा मुख्यमंत्री हा आसामचाच असायला हवा. तुमच्या मुख्यमंत्र्यांना आसामचीच कामं करायला हवी. सध्याचे मुख्यमंत्री दिल्ली आणि गुजरातच्या इशारावर कामं करतात. म्हणूनच आपल्याला त्यांना हटवायचं आहे," असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरAssamआसाम