शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या हृदयात की मुख्यमंत्री संजय राठोडांच्या खिशात?; भाजप नेत्याचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 12:39 IST

Pooja Chavan Death Case : रविवारी संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत सोपवला होता राजीनामा

ठळक मुद्देरविवारी संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत सोपवला होता राजीनामापूजाच्या आई-वडिलांनीही घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगतानाच या प्रकरणात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. दरम्यान, राठोड हे रविवारी दुपारी सपत्नीक वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.  दरम्यान, त्यांचा राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे सोपवण्यात न आल्याचं सांगत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला."मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा चार दिवसांनंतरही राज्यपालांकडे सोपवला नाही. याचा अर्थ राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत आणि ते खोटारडे आहेत हे यावरून सिद्ध होत आहे. प्रश्न इतकाच आहे की संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या हृदयात आहेत की मुख्यमंत्री हे संजय राठोडांच्या खिशात आहेत. खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आणि महिलांविषयी असंवेदना प्रगट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा भाजप निषेध व्यक्त करते," असंही भातखळकर म्हणाले. राठोडांनी दिला राजीनामाबीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते. सर्व बाजूंनी घेरले गेलेले राठोड हे रविवारी दुपारी सपत्नीक वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.  अशा प्रकारे राजीनामा द्यावा लागलेले राठोड हे पहिलेच मंत्री आहेत. पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांना भेटलेपूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण, आई मंदोदरी व बहीण दिव्याणी यांनी रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी नाही. पूजा व आमच्या कुटुंबाची नाहक बदनामी केली जात असून, गलिच्छ राजकारण केले जात आहे. संजय राठोड आमच्या समाजाचे नेते आहेत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांच्यावर गलिच्छ आरोप करणाऱ्या उलटसुलट बातम्या येत आहेत, त्या निराधार आहेत. पूजा मृत्यू प्रकरणात आपण चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आमचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही. त्यांना आरोपी ठरवून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ नका, फक्त संशयावरून त्यांचा बळी जाऊ नये, असे या तिघांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे

 

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरMaharashtraमहाराष्ट्र