शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
4
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
5
“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
6
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
7
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
8
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
9
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
10
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
11
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
12
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
13
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
14
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
15
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
16
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
17
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
18
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
19
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
20
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर

महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष; शेलार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 15:53 IST

कोरोना आणि बालकांच्या चिंतेच्या काळात १२ आमदारांची आठवण कशी येते?, शेलार यांचा सवाल.

ठळक मुद्देकोरोना आणि बालकांच्या चिंतेच्या काळात १२ आमदारांची आठवण कशी येते? शेलार यांचा सवाल.संजय राऊत यांच्यावरही साधला निशाणा.

"कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार धरता. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचं केवळ राजकारणावर लक्ष आहे.  यांना राजकारणाचा महारोग जडला आहे," अशी टीका भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. शेलार यांनी यावेळी खा. संजय राऊत यांच्या टीकेचाही समाचार घेतला. "भूत आणि भूताटकी ही नेमकं कसली वक्तव्य आहेत? रोज नुसतं १२-१२ ची टिमकी वाजवली जातेय. तुमचे काय १२ वाजलेत का? भुतानं जर फाइल पळवल्याचं तुमचं म्हणणं असेल तर मी सांगू इच्छितो की भाजप काहीही आज करत नाहीये. पण भाजपनं जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल हे राऊत यांनी लक्षात ठेवावं," असा जोरदार टोलाही शेलार यांनी लगावला.

बार्ज दुर्घटना प्रकरणी शापूरजी पालनजीवर गुन्हा दाखल कराअखिल भारतीय नाविक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन  एफकाँन्सचे संचालक मंडळ आणि शापूरजी पालनजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी तक्रार त्यांनी केली. "या प्रकरणात शापुरजी पालनजी यांच्या संचालकना वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील कुठला मंत्री त्यासाठी प्रयत्न करीत आहे?," असा सवालही शेलार यांनी केला. "या प्रकरणी कंपनीच्या अध्यक्षांवर का वर गुन्हा नाही. जो हजर नाही, आपली बाजू मांडू शकत नाही अशा कॅप्टनवर गुन्हा दखल केला गेला. हा डाव कुठल्या मजल्यावर शिजला हे मुख्यमंत्री सांगावे," असा आरोप ही त्यांनी केला आहे.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीcongressकाँग्रेसONGCओएनजीसीSanjay Rautसंजय राऊत