शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

"हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!" मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

By बाळकृष्ण परब | Updated: October 13, 2020 14:34 IST

Uddhav Thackeray News : कोरोनाला रोखण्यासाठी बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत यासाठी आज भाजपाने आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये "शेजारी-शेजारी" बसले आहेतउद्धव ठाकरे यांनीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमीपूजन ई पद्धतीने करा,असे अनाहूत सल्ले दिले होतेहे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!, अशी टीका आशिष शेलार यांनी केली

मुंबई - कोरोनाकाळात बंद असलेली राज्यातील देवस्थाने आणि मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आमने-सामने आले आहेत. दरम्यान, मला तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशा शब्दांत राज्यपालांवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हे कसले सत्तेचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!, असा टोला आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.कोरोनाला रोखण्यासाठी बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत यासाठी आज भाजपाने आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, मंदिरे उघडण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्याबाबत विचारणा केली होती. या पत्रात राज्यपालांनी हिंदुत्वाचाही उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला तुमच्याकडून हिंदुत्वाचे धडे घेण्याची गरज नाही, असा टोला लगावला आहे. त्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनीही भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे.आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणाले की,  उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये "शेजारी-शेजारी" बसले आहेत. उद्धव ठाकरे यांनीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमीपूजन ई पद्धतीने करा,असे अनाहूत सल्ले दिले होते."भारत तेरे तुकडे हो हजार" म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले. त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते. 

एवढेच नाही तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत यांनी केली. याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले. पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. 

हिंदुत्वाची आठवण करुन देणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी ठाकरी शैलीत लिहिले होते खरमरीत पत्र

मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराबाहेरही भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी आरती करुन मंदिरं उघडण्याची मागणी केली. त्यातच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्याची सूचना दिली आहे. तसेच, आपण हिंदुंचे कट्टर पुरस्कर्ते आहात, मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शनही घेतले. आषाढी एकादशीला पंढरीला जाऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुजाही केली. मात्र, राज्यात मंदिरे खुली करण्याबाबतची आपली भूमिका पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते. आपण, अचानक सेक्युलर तर झाले नाहीत ना? असा सवालही कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना जशास तसे उत्तर दिलंय.  

महोदय, आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात असल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी पत्रातून करुन दिलीय. 

महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्याचें हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ  ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?  मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र, मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. 

टॅग्स :Hindutvaहिंदुत्वAshish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा