Corona Vaccine: “महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या, तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”; भारती पवारांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 12:45 PM2021-08-16T12:45:23+5:302021-08-16T12:47:23+5:30

केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेते राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढत आहेत.

bjp bharati pawar criticized thackeray govt over corona vaccine in jan ashirwad yatra | Corona Vaccine: “महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या, तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”; भारती पवारांचे टीकास्त्र

Corona Vaccine: “महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या, तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”; भारती पवारांचे टीकास्त्र

Next

पालघर: केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेते राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्र सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवितानाच राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्र सोडणे, अशी या यात्रेची दुहेरी रणनीती असेल, असे सांगितले जात आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पालघरमधून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही यात सहभागी झाले आहेत. मोदी सरकारच्या कामाची, महत्त्वाच्या निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील त्रुटी दाखवण्यासाठी ही यात्रा आयोजित केली असल्याचे पवार यांनी सांगितले. (bjp bharati pawar criticized thackeray govt over corona vaccine in jan ashirwad yatra) 

आपल्या या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ग्रामीण भागातल्या लसीकरणाची माहिती घेणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे ही आपली जबाबदारी आहे. कोणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, हाच या जनआशीर्वाद यात्रेचा हेतू असणार आहे, असे भारती पवार यांनी सांगितले. तसेच कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून जास्त गर्दी न करता ही यात्रा करणार असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. 

“विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय, पण...”; कपिल सिब्बलांचे रोखठोक मत

तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच

भारती पवार यांची ही जनआशीर्वाद यात्रा पालघर, मनोर, चारोटी, तालसरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडामार्गे जाणार आहे. केंद्रीय मंत्री म्हणून स्थानिक आरोग्यसुविधांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे पाहणे आपली जबाबदारी असल्याचे भारती पवार यांनी सांगितले. केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, अशा शब्दांत ठाकरे सरकारवर टीका केली.

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेचे आमदार संजय केळकर प्रमुख आहेत. कपिल पाटील यांनी ठाणे व रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटरची यात्रा सुरू केली असून, डॉ. भागवत कराड यांनी मराठवाड्यात ६२३ किलोमीटर यात्रेला सुरुवात झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे त्यांच्यासोबत आहेत. तर, नारायण राणे यांची यात्रा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे. या यात्रेत चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील. तसेच केंद्र सरकारी योजनांच्या लाभार्थींशीही संवाद साधतील, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: bjp bharati pawar criticized thackeray govt over corona vaccine in jan ashirwad yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.