शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

Pooja Chavan Suicide Case : "निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस, संजय राठोड यांना अटक करा", भाजपाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 18:17 IST

Atul Bhatkhalkar And Sanjay Rathod Over Pooja Chavan Suicide Case : भाजपाच्या अनेक नेत्यांनी संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याच दरम्यान भाजपाच्या अनेक नेत्यांनी संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हे संजय राठोड यांच्या वक्तव्यावरून दिसून येत होतं. राठोड यांची आजची अवस्था म्हणजे सामनामधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी झालीय" असं म्हणत भाजपाने घणाघात केला आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना राठोडांवर निशाणा साधला आहे, 

अतुल भातखळकर यांनी संजय राठोड यांना अटक करा अशी मागणी देखील केली आहे. "निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हे संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन दिसून येत होतं. संजय राठोड यांची आजची अवस्था म्हणजे सामनामधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी झालीय. त्यांनी एकाही प्रश्नचं उत्तर दिलं नाही. फक्त समाजाच्या नावावर भावनिक शब्द बोलून ते निघून गेले. ऑडिओ क्लिपमधल्या आवाजावर ते बोललेले नाहीत. आईबाबांचं नाव घेऊन ते निघून गेले. राठोड यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे" असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. 

संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे; भाजप नेत्याची बोचरी टीका

संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली झाली होती. तसंच घरातून निघाल्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफाही त्यांच्यासोबत होता. यावरून अतुल भातखळकर यांनी त्यांची तुलना गजा मारणेशी करत टोला लगावला. "संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत. तो गुंड होता हे मंत्री आहेत एवढाच फरक.  समाजाला टाचेखाली चिरडणारी दबंग मानसिकता सारखीच आहे," असं म्हणत भातखळकर यांनी राठोड यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर हल्लाबोल केला. "जंगल मंत्री संजय राठोड पोहरा गडावर शक्तिप्रदर्शन करणार असतील तर संशयित गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने निरर्थक शक्ती कायद्याची टिमकी वाजवून नये. तसंच मुख्यमंत्र्यांनी घरबसल्या जनतेला उपदेश करणारे रटाळ फेसबुक लाईव्ह कार्यक्रम करू नयेत," असंही ते म्हणाले. 

"राज्यातील महिला मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही, संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा"

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अतुल भातखळकर यांनी वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली. तसेच या राज्यात महिला सुरक्षित तर नाहीत. पण राज्यातील महिला या मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही आहेत असं देखील याआधी म्हटलं होतं. "वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी. या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी असावेत"अशी मागणी भातखळकर यांनी केली होती. 

सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न - प्रविण दरेकर 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सुद्धा टीका केली आहे. "संजय राठोड यांनी फक्त मीडियासमोर येण्याचं नाटक केलं. समाजाचा दबाव निर्माण करुन त्यांनी प्रसारमाध्यमांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला. वाटलं होतं की ते प्रायश्चित्त घेतील. राजीनामा देतील आणि निर्दोषत्व सिद्ध करतील. पण सत्ताच आपल्याला यातून सोडवू शकत असल्याचं त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला नाही. संजय राठोड यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला कसा झाला?, याबाबत भाष्य केलं नाही. त्यांनी सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला" असं दरेकर यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाSanjay Rathodसंजय राठोडMaharashtraमहाराष्ट्रSanjay Rathodसंजय राठोड