शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

Bihar Assembly Election Results: मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?

By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 1:26 PM

Bihar Assembly Election Results: भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्ष जेडीयूला जोरदार फटका

पाटणा: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाचं सरकार कायम राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर सकाळी सुसाट सुटलेल्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची आता पिछेहाट होताना पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं सध्याचे आकडे सांगत आहेत. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूला मोठा फटका बसला आहे.भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपचं सरकार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जेडीयूचे १४ मंत्री आहेत. तर १० जण भाजपचे आहेत. यातील भाजपचे जवळपास सगळेच मंत्री आघाडीवर आहेत. तर जेडीयूच्या मंत्र्यांची पिछेहाट सुरू आहे. चिराग पासवान यांच्या नेतृत्त्वाखालील लोकजनशक्ती पक्षामुळे अनेक ठिकाणी जेडीयूच्या अडचणी वाढल्या आहेत.बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढेसध्याच्या घडीला जेडीयूचे अर्धा डझन मंत्री पिछाडीवर आहेत. यातील बऱ्याच ठिकाणी तिरंगी लढत सुरू आहे. लोकजनशक्ती पक्षानं आव्हान दिल्यानं जेडीयूचे उमेदवार मागे आहेत. सहकार मंत्री जय सिंह दिनारा विधानसभा मतदारसंघात मागे आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी लोजपनं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय जहानाबादमध्ये कृष्णनंदन प्रसाद वर्मा (शिक्षण मंत्री), जमालपूरमध्ये शैलेश कुमार (ग्रामविकास मंत्री), राजपूरमध्ये संतोष कुमार निराला (परिवहन मंत्री), हथुआमध्ये रामसेवक सिंह (राज्यमंत्री) पिछाडीवर आहेत. तर बहादूरपूरमध्ये मदन सहानी (खाद्य मंत्री) अतिशय थोड्या मतांनी पुढे आहेत. या ठिकाणीही लोजपनं उमेदवार दिल्यानं जेडीयूचा फटका बसला आहे.तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊतमोदींचे हनुमान जेडीयूवर भारी पडले?बिहार विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी जेडीयूविरोधात शड्डू ठोकत भाजपसाठी सोयीस्कर ठरणारी भूमिका घेतली. आपण मोदींचे हनुमान अशी स्वत:ची ओळख ते सांगत होते. त्याचा फायदा पासवान यांना फारसा होताना दिसत नाही. मात्र जेडीयूचं नुकसान करण्यात त्यांना यश मिळाल्याचं दिसत आहे. लोजपच्या मदतीनं भाजपचा जेडीयूवर बाण?भाजप, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी यांची बिहारमध्ये आघाडी होती. मात्र जागावाटपावरून लोजपानं राज्यात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपण मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या जेडीयूच्या विरोधात आहोत. पण भाजपच्या विरोधात नाही, असं स्पष्ट भूमिका लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांनी घेतली. एनडीएच्या बाहेर पडल्यावर त्यांनी जेडीयूच्या विरोधात दंड थोपटले. जेडीयूचे उमेदवार असलेल्या सगळ्याच जागांवर त्यांनी उमेदवार दिले. त्याचा फटका जेडीयूला बसताना दिसत आहे.सध्याच्या मतमोजणीचे कल पाहता भाजपानं जेडीयूला मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे लोजपनं जेडीयूच्या विरोधात भूमिका घेत असताना भाजपला आव्हान दिलं नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपचा विजय सोपा झाला. तर लोजपच्या विरोधी भूमिकेचा फटका थेट जेडीयूला बसला. नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार, असं भाजप नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील कुमारच मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट केलं. मात्र जेडीयूच्या जागा कमी झाल्यानं नव्या सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती असतील हे स्पष्ट आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी