Babul Supriyo: रामदेव बाबांच्या एका शब्दावर भाजपाने तिकिट दिलेले; बाबुल सुप्रियोंनी तो किस्सा सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 06:36 PM2021-07-31T18:36:04+5:302021-07-31T18:37:05+5:30

BJP MP, former minister Babul Supriyo quits politics: बाबुल सुप्रियो यांनी आज सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहीली आहे. यामध्ये त्यांनी राजकारण का सोडत आहे ते आडून आडून सांगितले आहे. तसेच भाजपासोबत मतभेद असल्याचेही म्हटले आहे.

Babul Supriyo quits politics: BJP gave ticket on one word of Ramdev Baba; Babul Supriyo told the story | Babul Supriyo: रामदेव बाबांच्या एका शब्दावर भाजपाने तिकिट दिलेले; बाबुल सुप्रियोंनी तो किस्सा सांगितला

Babul Supriyo: रामदेव बाबांच्या एका शब्दावर भाजपाने तिकिट दिलेले; बाबुल सुप्रियोंनी तो किस्सा सांगितला

Next

भाजपाचे माजी मंत्री आणि पश्चिम बंगालमधील मोठे नाव बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी आज राजकारणाला रामराम करत असल्याची घोषणा केली. गेल्या काही काळापासून बाबुल सुप्रियो नाराज होते. यामुळे ते मोठा निर्णय घेतील असा अंदाज बांधला जात होता. नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. पश्चिम बंगालचे असल्याने बाबुल ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्येही जाण्याची शक्यता होता. परंतू बाबुल यांनी आज राजकारणच सोडण्याची घोषणा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Baba Ramdev gave Loksabha Election Ticket to singer Babul Supriyo.)

Babul Supriyo: भाजपाला मोठा धक्का! माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार

बाबुल सुप्रियो यांनी आज सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहीली आहे. यामध्ये त्यांनी राजकारण का सोडत आहे ते आडून आडून सांगितले आहे. तसेच भाजपासोबत मतभेद असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही, माझा पक्ष भाजपाच होता आणि राहिल असे म्हणत ज्यांना समजायचेय ते समजून जातील, असे सूचक वक्तव्य केले आहे. महत्वाचे म्हणजे बाबुल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारावेळी वगळले होते. 

मला कोणत्याही पक्षाने फोन केलेला नाही, मी कुठेही जाणार नाही. टीएमसी, काँग्रेस किंवा सीपीआयएम, कुठेच नाही. मी नेहमी एका टीमचे समर्थन केले आहे. मी अमित शहा (Amit Shah) आणि जेपी नड्ड्ना (JP Nadda) यांना राजकारण सोडण्याचे सांगितले आहे. मी त्यांचा आभारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. परंतू कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra modi) नाव घेतलेले नाही. 

खासदारकीचे तिकीट कसे मिळालेले...
सुप्रियो यांनी आपल्या पोस्टमध्ये बाबा रामदेव (Ramdev Baba) यांचे नाव घेतले आहे. बाबा रामदेव आणि मी एकाच विमानात होतो. तेव्हा त्यांच्याशी काही वेळ बोलणे झाले. त्यांच्या बोलण्यातून भाजपा यावेळी बंगालला गंभीरतेने घेणार आहे, असे समजले. परंतू तेवढ्या सीट येणार नाहीत. यावेळी रामदेव बाबांनी भाजपाकडे मला उमेदवार करण्यासाठी शब्द टाकला, असे ते म्हणाले. (Babul Supriyo got ticket after when they meet to baba Ramdev in Flight)

Web Title: Babul Supriyo quits politics: BJP gave ticket on one word of Ramdev Baba; Babul Supriyo told the story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.