शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

UP panchayat Election: अयोध्या, काशी, मथुरा! भाजपाचा दारूण पराभव; पंचायत निवडणुकीत सपा, बसपाने चारली धूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 09:46 IST

Uttar Pradesh panchayat Election Result: अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीसह राज्यभरात सपाने भाजपाला चितपट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही जिल्हे योगी आदित्यनाथ सरकारच्या अजेंड्यामध्ये नेहमी असतात.

UP Panchayat Election Results 2021: पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकांनी (Uttar Pradesh panchayat Election) भाजपाची (BJP Defeat) झोप उडविली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा झटका बसला आहे. अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीसह राज्यभरात सपाने भाजपाला चितपट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही जिल्हे योगी आदित्यनाथ सरकारच्या (Yogi Adityanath) अजेंड्यामध्ये नेहमी असतात. या तीन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून योगी सरकारने खूप मेहरबानीदेखील केली आहे. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत झालेली पडझड भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठे संकेत देत आहे. ( Bjp's big Defet in UP Panchayat Election Ayodhya, Kashi, Mathura. Samajvadi party, BSP won.)

रामाची नगरी अयोध्येमध्ये भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अयोध्या जनपदमध्ये जिल्हा पंचायत सदस्यांच्या 40 जागा आहेत. यापैकी 24 जागांवर समाजवादी पक्षाने झेंडा फडकावला आहे. भाजपाला फक्त 6 जागा मिळाल्या आहेत. तर 12 अपक्षांच्या पारड्यात गेल्या आहेत. भाजपाला बंडखोरीमुळे मोठा पराभव पहावा लागला आहे. 13 जागांवर बंडखोरी झाली होती. राममंदीर बनत असताना अयोध्येत भाजपाला मोठा झटका बसला आहे. 

पंतप्रधानांच्या काशीमध्ये सपाचा डंकापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात भाजपाची हालत चिंताजनक बनली आहे. एमएलसी निवडणुकीनंतर जिल्हा पंचायत निवडणुकीतही भाजपाला काशीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा पंचायतीच्या 40 पैकी 8 जागा जिंकता आल्या आहेत. बसपाला पाच जागा मिळाल्या आहेत. बनारसमध्ये अपना दलाला 3 जागा, आपला 1 आणि सुहेलदेव यांच्या भारतीय समाज पार्टीला 1 जागा मिळाली आहे.तीन अपक्ष जिंकले आहेत. 2015 मध्ये देखील भाजपाला इथे मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, योगी सरकारने सत्तेत येताच जिल्हा पंचायतीची खूर्ची सपाकडून हिसकावली होती. 

श्रीकृष्णांच्या मथुरेतही पदरी निराशाभगवान श्रीकृष्णांची नगरी समजल्या जाणाऱ्या मथुरेतही भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. मथुरेमध्ये बसपाने बाजी मारली आहे. बसपाने 12, आरएलडीने 9 जागंवर विजय मिळविला आहे. तर भाजपाला 8 जागा मिळाल्या आहेत. सपाला 1च जागा जिंकता आली आहे. 3 अपक्ष जिंकले आहेत. मथुरेत काँग्रेसच्या झोळीत भोपळा आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षच निवडणूकीत पडले आहेत. मथुरेत शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे भाजपाला पराभव पत्करावा लागल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ