शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

Assam Assembly Elections 2021: आसामला घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही : अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 5:22 AM

Assam Assembly Elections 2021 News : आसामला पुन्हा घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही, असे स्पष्ट करतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांना कठोर शब्दात सांगितले की, गत पाच वर्षांत भाजपने अतिक्रमण केलेली जमीन यशस्वीपणे मुक्त केली आहे. 

बिजनी : आसामला पुन्हा घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही, असे स्पष्ट करतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांना कठोर शब्दात सांगितले की, गत पाच वर्षांत भाजपने अतिक्रमण केलेली जमीन यशस्वीपणे मुक्त केली आहे. चिरांग जिल्ह्यात बिजनी येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, अजमल हे दावा करतात की, आगामी सरकारची किल्ली त्यांच्या हातात असेल. मात्र, त्यांना याची कल्पना नाही की, कुलूप आणि किल्ली आसामच्या जनतेच्या हातात आहे. शहा यांनी काँग्रेसवर घुसखोरी रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आम्हाला आणखी पाच वर्षे द्या. माणसेच काय पक्षीही घुसखोरी करू शकणार नाहीत. अमित शहा म्हणाले की, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी अजमल यांच्याबाबत म्हटले होते की, कोण आहेत अजमल. मात्र, आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, एआययूडीएफ आसामची ओळख आहे. हे राज्य वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव, भारतरत्न गोपीनाथ बोरदोलाई आणि भूपेन हजारिका यांचे आहे.  आज मतदानआसाम विधानसभा निवडणुकीत गुरुवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून त्यातून पाच मंत्री, उपसभापती आणि विरोधकांतील काही महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य निश्चित होईल. या टप्प्यात २६ महिलांसह ३४५ उमेदवार मतदारांचा कौल मागत आहेत. कोरोना विषाणूला रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालेल.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Amit Shahअमित शहाBJPभाजपाPoliticsराजकारणAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021