शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Assam Assembly Election: पटनापासून १४०० किमीवर वसलेलं ‘मिनी बिहार’; जेथे बिहारी लोक बनवतात सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 8:20 AM

आसाममधील एक जिल्हा तिनसुकिया. जे पटना पासून जवळपास १४०० किमी दूर आहे, या जिल्ह्याला मिनी बिहार म्हणून ओळखलं जातं

ठळक मुद्देतिनसुकिया मतदारसंघातून बिहारचे शिव शंभु ओझा आमदार होते, ओझा यांचा तेथील राजकारणावर दबदबा होतातिनसुकिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने हिरादेवी चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.तिनसुकिया मतदारसंघात हिंदी भाषिकांची संख्या अधिक असल्याने हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहे.

पटना – बिहारमधून इतर राज्यात स्थलांतरण केलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे, कामानिमित्त बिहारमधून लोक बाहेरच्या राज्यात जातात आणि त्याठिकाणी आपली संख्या वाढवतात. त्यामुळे अनेक राज्यात बिहारी लोकांच्या लोकसंख्येवर तेथील स्थानिक राजकारण अवलंबून असतं. सध्या आसाम विधानसभा निवडणुकीत बिहारी लोकांचं वर्चस्व समोर येत आहे.

आसाममधील एक जिल्हा तिनसुकिया. जे पटना पासून जवळपास १४०० किमी दूर आहे, या जिल्ह्याला मिनी बिहार म्हणून ओळखलं जातं, याठिकाणी बिहारी लोकांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरते, तिनसुकिया मतदारसंघातून बिहारचे शिव शंभु ओझा आमदार होते, ओझा यांचा तेथील राजकारणावर दबदबा होता, यंदाही २०२१ च्या निवडणुकीत तिनसुकिया मतदारसंघात बिहारी मतदान निर्णायक भूमिकेत आहे.

आसाममधील तिनसुकिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने हिरादेवी चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. हिरादेवी मूळच्या बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या आहेत. १९८४ मध्ये लग्नानंतर हिरादेवी आसाममध्ये आल्या. तिनसुकिया जिल्ह्यातील त्या मोठ्या उद्योजिका आहेत. सध्या हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे.  याठिकाणी विद्यमान आमदार संजोय किशन हेदेखील मैदानात उतरले आहेत. मागील वेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार आणि सलग ३ वेळा आमदार राहिलेले राजेंद्र प्रसाद सिंह यांचा पराभव केला होता. त्यानंतर राजेंद्र सिंह भाजपात सहभागी झाले होते, त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसने राजदसाठी सोडला आहे.

१५०० कुटुंब अधिक हिंदी भाषिकांची संख्या

तिनसुकिया जिल्ह्यात जवळपास १५०० कुटुंब असे आहेत, जे प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेत, जिल्ह्यातील ११०० गावांपैकी ३०० गावात हिंदी भाषिक आहेत, अनेक जण आसाममध्ये तीन-चार पिढ्यापासून राहत आहेत. आसाममध्ये अनेकदा बिहारी लोकांमुळे स्थानिकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत तेथे हिंसक आंदोलन घडले आहेत. तिनसुकिया मतदारसंघात हिंदी भाषिकांची संख्या अधिक असल्याने हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहे. येथे पहिल्यांदा राधाकृष्ण खेमका निवडून आले होते, ते २ वेळा आमदार होते, १९८५, १९९१ मध्ये येथून काँग्रेसचे शिव शंभू ओझा विजयी झाले, ते आसामच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते तत्कालीन मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांचे निकटवर्तीय होते.   

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेसBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहार