शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

"केंद्र सरकार निर्दयी आणि पाषाणहृदयी, त्यांना अन्नदात्या बळीराजाचे अश्रूही दिसत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:14 IST

Aslam Sheikh Criticize Central Government : एका बाजूला समाजात सांप्रदायिकतेचं विष पेरायचं आणि दुसरीकडे देश विकायला काढायचा. मोदी सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे.

मुंबई - एका बाजूला समाजात सांप्रदायिकतेचं विष पेरायचं आणि दुसरीकडे देश विकायला काढायचा. मोदी सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अन्नदात्या बळीराजाचे अश्रूही दिसू नयेत, एवढं निर्दयी व पाषाणहृदयी केंद्र सरकार आहे.काल सायंकाळी रॅलीमध्ये मालाड-मालवणीच्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मोदी सरकारचा अस्त आता समीप आला आहे, असा घणाघात मुंबई शहरचे पालकमंत्री व काॅंग्रेस नेते अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर केला आहे. काल सायंकाळी  इंधन दरवाढी विरोधात मालाड-मालवणी येथे आयोजित भव्य पदयात्रेनंतरच्या सभेत ते बोलत होते. 

दिवसागणिक वाढत चाललेली महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भीडणारे भाव, अतिदक्षता विभागात दाखल झालेला जीडीपी, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे कृषी कायद्याबाबत जाब विचारण्यासाठी काॅंग्रेस मालाड (प.) विधानसभा क्षेत्राच्यावतीने मंगळवारी पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले होते.  मालवणी-अंबोजवाडी येथे या पदयात्रेचे रुपांतर मोठ्या सभेत झाले. 

यावेळी अस्लम शेख व मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप  यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. काॅंग्रेसचे हजारो कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी होत मोदी सरकार विरोधातल्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेविरोधात निकराचा लढा काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी दिला होता. आज त्याच प्रकारचा संघर्ष काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिप्रेत आहे, असे आवाहन शेख यांनी भाषणाच्या शेवटी काॅंग्रेस कार्यकर्त्यांना केले. 

काॅंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकविणारा शेतकरी मोदी सरकारला त्याच मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत देशाला सांप्रदायिक शक्तींपासून काॅंग्रेसचे धर्मनिरपेक्ष विचारच वाचवू शकतात असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काॅंग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत, काॅंग्रेसचे युवा नेते हैदर शेख, नगरसेविका कमरजहाॅं सिद्दकी, नगरसेवक विरेंद्र चौधरी, डाॅ. नॅक्सन नाटके, धनाजी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

 मंगलप्रभात लोढा यांचा घेतला समाचार अस्लम शेख यांनी भाषणात  भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी भाजपाचे मुंबई अध्यक्ष लोढा यांनी मालवणी परिसराचा दौरा करुन मालवणीत  हिंदू व दलितांवरती अत्याचार होत आहेत असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले की,  सर्व जाती-धर्मांचे लोक या मालवणीेत गेल्या अनेक वर्षांपासून गुण्या गोविंदाने नांदत आहेत. ही मालवणी म्हणजे हिंदुस्थान आहे. पण काही मालवणीत येऊन येथील धार्मिक सलोखा बिघडवू पाहत आहेत,अशा लोकांना कायद्याच्या भाषेत उत्तर द्यायला आपण सक्षम असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

टॅग्स :MumbaiमुंबईPoliticsराजकारणcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार