शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अमोल कोल्हेंना पाडणार : राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याची बॅनरबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 13:49 IST

शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आलेले आणि नुकतेच शिरूर लोकसभेचे तिकीट जाहीर झालेल्या डॉ अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच बंडाळीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे :शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आलेले आणि नुकतेच शिरूर लोकसभेचे तिकीट जाहीर झालेल्या डॉ अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच बंडाळीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागातल्या एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने 'अमोल कोल्हे यांना पाडणार' अशा अर्थाची बॅनरबाजी केल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. 

 २०१४साली शिरूरमधून माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात अपयश आले होते. यावेळीही त्यांना उमेदवारी मिळावी याकरिता त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते. यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवारांसमोर घोषणाबाजी केली होती. दुसरीकडे कोल्हे यांना अपॆक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे. तीन वेळा प्रयत्न करूनही धोका दिलेली शिरूरची जागा काहीही करून मिळवायची असा चंग राष्ट्रवादीने बांधला असताना मात्र कोल्हे यांना कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

सागर डुंबरे नावाच्या या बॅनरमध्ये लिहिताना ''अमोल कोल्हे राष्ट्रवादीतून लढणार असतील तर त्यांना आम्ही आमची ताकद दाखवणार, अडचणीच्या काळात राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या लांडे यांना उमेदवारी न दिल्याने कोल्हे यांना पाडण्याची भाषाही या बॅनरमध्ये केली आहे''. निवडणूक तोंडावर आलेली असताना कार्यकर्त्यांची नाराजी कोल्हे यांना परवडण्यासारखी नाही. त्यामुळे आता यावर कोल्हे आणि राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया होते हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShirurशिरुर