शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

Amit Shah in Lok Sabha : अमित शाहंचा ओवेसींवर निशाणा, "तुमच्या मनात सर्वकाही हिंदू-मुस्लीम... मी समजतो"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 3:56 PM

Amit Shah in Lok Sabha : अधिकाऱ्यांना हिंदू मुस्लीम असं विभागून तुम्ही स्वस्ताला सेक्युलर म्हणवता का?,शाह यांचा ओवेसींना सवाल

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना हिंदू मुस्लीम असं विभागून तुम्ही स्वस्ताला सेक्युलर म्हणवता का?,शाह यांचा ओवेसींना सवाल जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ लोकसभेत पारित.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी लोकसभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी कलम ३७० हटवण्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही उत्तर देत विरोधकांना धारेवर धरलं. "या ठिकाणी विचारण्यात आलं की कलम ३७० हटवल्यानंतर जी आश्वासनं दिली त्या दृष्टीनं काय केलं गेलं? कलम ३७० हटवून १७ महिने झाले आणि तुम्ही आमच्याकडून हिशोब मागत आहात. तुम्ही ७० वर्षांत काय केलं याचा हिशोब आणलाय का? जर ७० वर्ष योग्यरित्या चालला असता तर आमच्याकडून हिशोब मागायची वेळ आली नसती. ज्यांना पिढ्यानपिढ्या शासन करण्याची संधी मिळाली त्यांनी स्वत:कडे पाहून ठरवावं की आपण हिशोब मागण्याच्या लायक आहोत का?," असं म्हणत शाह यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आतापर्यंत प्रशासनच तिकडे परिस्थिती सांभाळतच होतं तितक्यात कोरोनाची महासाथ आली. मी सर्व कामांचा तुम्हाला हिशोब देतो असंही शाह म्हणाले. जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक 2021वर बोलताना शाह यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही निशाणा साधला. "तुम्ही अधिकाऱ्यांचे हिंदू मुस्लीम म्हणून विभाजन करत आहात. तुमच्या मनात प्रत्येक गोष्ट हिंदू मुस्लीम आहे. मी तर तुम्हाला समजतो. एक मुस्लीम अधिकारी हिंदू जनतेची आणि हिंदू अधिकारी मुस्लीम जनतेची सेवा करू शकत नाही का? अधिकाऱ्यांना हिंदू मुस्लीम असे विभागून तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणवता का?," असा टोला शाह यांनी ओवेसींनाही लगावला.दबावात ४ जी सेवा सुरू नाहीयापूर्वी ओवेसी यांनी सरकारवर निशाणा साधत काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय दबावाखाली येऊन ४ जी सेवा सरकारनं सुरू केल्या आरोप केला होता. यावरही अमित शाह यांनी उत्तर दिलं. "ओवेसी हे ज्यांचं समर्थन करतात ते युपीएचं सरकार आता नाही. हे नरेंद्र मोदी यांच्या भाजपचं सरकार आहे. या देशाचे निर्णय हा देशच करतो, इथली संसद करते, आमच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही," असंही शाह यांनी स्पष्ट केलं. अधीर रंजन चौधरींवर निशाणाचर्चेदरम्यान अमित शाह यांनी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्लाबोल केला. "तुम्ही आम्हाला विचारत आहात? तुम्ही तर मोबाईलच बंद केले होते आणि २० वर्षांसाठी बंद केले होते. त्यावेळी सर्व अधिकारी कुठे गेले होते?," असा सवाल शाह यांनी केला.आतापर्यंत तीनच कुटुंबांचं शासन"काश्मीरमध्ये आतापर्यंत तीन कुटुंबांचचं शासन होतं आणि यासाठी कलम ३७० हटवण्यावर त्रास होत आहे. आम्ही जम्मू काश्मीरमध्ये पंचायत राजची स्थापना केली. निवडणुकांमध्ये घोटाळा झाला याचा आरोप कोणीही करू शकत नाही. जम्मू काश्मीरमध्ये सर्व अधिकारी हे भारतमातेचेच सुपुत्र आहेत. राजा राणीच्या पोटी जन्म घेणार नाही तर मतांमधून घेईल," असंही शाह यावेळी म्हणाले. जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ चं जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याशी कोणत्याही प्रकारचं घेणंदेणं नाही. योग्य वेळ आल्यानंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचंही शाह यांनी स्पष्ट केलं. कोणाच्या दबावाखाली ३७० कायम होतं?"कोणाच्या दबावाखाली इतके वर्ष कलम ३७० कायम ठेवण्यात आलं होतं? तुम्ही १७ महिन्यांचा हिशोब मागत आहात ७० वर्षांपर्यंत जेव्हा कलम ३७० लागू होतं तेव्हा का हिशोब मागत नव्हता? तात्पुरत्या स्वरूपातील कलम हटवण्यात आलं नाही कारण तुम्हाला मतांचं राजकारण करायचं होतं," असा आरोपही शाह यांनी यावेळी केला.विकासाला प्राधान्यजम्मू काश्मीरमध्ये विकासाला आम्ही प्राधान्य देत आहोत आणि तेच आमच्या हृदयातही आहे. आतापर्यंत २८ योजना पूर्ण करण्यात आल्या. याव्यतिरिक्त २०२२ पूर्ण जम्मू काश्मीरमधील २५ हजार बेरोजगारांना नोकरीदेखील देणार असल्याचं आश्वासन शाह यांनी दिलं. "पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याच्या दर्जा परत देणार असल्याचं आश्वासन दिल्याचं म्हटलं जात आहे. होय त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि मी जनतेला विश्वास देऊ इच्छितो की योग्य वेळ आल्यानंतर जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल. जम्मू काश्मीर आणि लेहच्या मुद्द्यावर राजकारण करण्याची गरज नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाAmit Shahअमित शहाBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370