शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांकडून तोंडभरुन कौतुक, आता नारायण राणेंची केंद्रात मंत्रीपदी वर्णी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 16:52 IST

amit shah in sindhudurga : अमित शहा यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात केली नारायण राणे यांची तोंडभरुन स्तुती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात नारायण राणे (narayan rane) यांच्या मेडिकल कॉलेजचं उदघाटन झालं. उदघाटन कार्यक्रमात अमित शहा यांनी नारायण राणे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. याशिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीतही राणे यांनी भाजपला रत्नागिरी-सिंधुदुर्गात चांगलं यश मिळवून दिलं आहे. यामुळे अमित शहा हे नारायण राणे यांच्यावर खूश झाले असून त्यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. (amit shah praises narayan rane)

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल

नारायण राणे यांच्या 'लाइफटाइम' या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शहा यांनी नारायण राणे हे अतिशय मेहनती आणि अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते असल्याचं म्हणत त्यांच्या कामांचं तोंडभरुन कौतुक केलं. 

नारायण राणेंवर भाजपमध्ये अन्याय होणार नाही"नारायण राणे हे जिथं अन्याय होतो तिथं निडरपणे संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायाविरोधात लढू शकत नाही. तो जनतेसाठी देखील लढू शकत नाही. नारायण राणे हे अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द वळणावळणाची राहीली आहे. पण राणे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होणार नाही याची मी ग्वाही देतो. राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं हे भाजपला चांगलं समजतं", असं अमित शहा म्हणाले. शहा यांनी या विधानातून राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाण्याचे संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे. 

दरम्यान, सिंधुदुर्गात आयोजित कार्यक्रमात अमित शहा यांच्यासोबत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Amit Shahअमित शहाsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा