शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

नाना पटोलेंच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीत बेबनाव, अजितदादांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केला संताप, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 16:35 IST

Nana Patole News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील हे सरकार स्थिर असून, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने केला जातो. मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून बेबनाव होताना दिसत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होताअजित पवार यांनी पटोले यांनी केलेले आरोप खोडून काढले अशा आरोपांमुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची भावनाही अजित पवार यांनी व्यक्त केली

मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत राज्यात स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला आता पावणे दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील हे सरकार स्थिर असून, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने केला जातो. मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून बेबनाव होताना दिसत आहे. आता नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडीत तीव्र मतभेद निर्माण झाले आहे. पटोलेंच्या या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar ) हे संतप्त झाले आहे.(Ajit Pawar expressed his indignation directly to the Chief Minister on Nana Patole's Allegations)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता, त्यावर संतप्त प्रकिक्रिया व्यक्त करताना अजित पवार यांनी पटोले यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत. तसेच अजित पवार यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे संताप व्यक्त केला आहे. अशा आरोपांमुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची भावनाही अजित पवार यांनी व्यक्त केली.

नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी हे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरू आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. आपण त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, परंतू त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदे आहेत. यामुळे त्यांच्याकडून असे यापुढेही होणार आहे, असे पटोले म्हणाले. मी रात्री ३ वाजता दौऱ्यावर निघालो ते देखील त्यांना तेव्हाच माहिती होते, असा आरोप त्यांनी केला होता. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण