कृषी विधेयक शेतकऱ्यांना बाजार समितीच्या जोखडातून बाहेर काढेल - माजी कृषीमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 23:21 IST2020-10-11T23:20:06+5:302020-10-11T23:21:22+5:30
Agriculture Bill 2020 News: कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात आत्मनिर्भर भारत व कृषी विधेयक संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

कृषी विधेयक शेतकऱ्यांना बाजार समितीच्या जोखडातून बाहेर काढेल - माजी कृषीमंत्री
कर्जत : ‘कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी चांगले असून, हे विधेयक शेतकºयांना कृषी उत्पन्न समित्यांच्या जोखडातून बाहेर काढेल,’ असा विश्वास भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
विरोधक या विधेयकाला विरोध करीत आहेत, तसेच शेतकºयांची दिशाभूल करीत आहेत. खरे तर काँग्रेसच्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास, आम्ही शेतकरी करार करण्याचे जाहीर करण्यात आले आहे, परंतु ते आता शब्द फिरवीत आहेत. या विधेयकाने शेतकरी आपला शेतीचा माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये न देता, शेताच्या बांधावर किंवा स्वत:च्या दुकानात विकू शकतो. त्यामुळे त्याचा फायदाच होणार आहे,’ असे बोंडे म्हणाले.
कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात आत्मनिर्भर भारत व कृषी विधेयक संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी सुधीर दिवे, ललित समदूरकर, कोकण समन्वयक सुनील गोगटे, अशोक गायकर, परशुराम म्हसे, भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, हृषिकेश जोशी आदी उपस्थित होते. सुधीर दिवे यांनी ‘पाच हजार तालुक्यांत पाचशे शेतकºयांचा समूह तयार करण्यात येणार आहे. त्यांना तीन वर्षांसाठी तीस लाख रुपये देण्यात येणार असून, पाच वर्षे हा समूह चालवायचा आहे. त्यासाठी चांगला निधी केंद्र सरकारने जाहीर केला आहे,’ असे स्पष्ट केले.