शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला विरोध, मग काँग्रेसवाले गुणांचे पुतळे आहेत का? - ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:50 IST

आम्हाला विरोध असेल, तर मग काँग्रेस-राष्ट्रवादीवाले गुणांचे पुतळे आहेत का, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता रविवारी धारावीच्या प्रचारसभेत केला.

मुंबई : काहीजण नुसतच सांगतात, यांना मत देऊ नका. मग कोणाला मत द्यायचे ते तरी सांगा. आम्हाला विरोध असेल, तर मग काँग्रेस-राष्ट्रवादीवाले गुणांचे पुतळे आहेत का, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता रविवारी धारावीच्या प्रचारसभेत केला.आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो, म्हणून गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, असा दावाही त्यांनी केला आणि पूर्ण केलेल्या योजनांची माहिती दिली. दक्षिण मध्य मुंबईतील युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पन्नास-साठ वर्षांत काँग्रेसने देशावर दरोडा घातला. जनता काँग्रेसवाल्यांचा भ्रष्टाचार कधी विसरू शकत नाही. काँग्रेसवाल्यांनी अतिरेक्यांना पुन्हा पाकिस्तानात सोडून दिले. युती सरकारने मात्र पाकिस्तानात घुसून त्यांचा पाडाव केला. काँग्रेसवाले देशद्रोहाचे कलम काढून टाकणार आहेत. आम्ही देशद्रोह्यांना गाडून टाकणार आहोत. राहुल गांधी म्हणतात ३७० कलम आम्ही काढणार नाही. असले देशद्रोही कलम काढायचे नाही, तर मग जवानांनी कशासाठी लढायचे, असा सवालही त्यांनी केला.युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची जन्मभूमी धारावी आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने धारावीतून निवडून येऊन फक्त थापा मारल्या. मुंबईची निगा राखणारे लोक धारावीत राहतात. त्यांची निगा आपल्याला राखायची आहे. योजना या फक्त कागदावर राहणार नाहीत, त्या अंमलात आणल्या जातील, हा शिवसेनेचा शब्द आहे. राहुल शेवाळे यांनी ‘मेड इन धारावी’च्या माध्यमातून धारावीला ब्रँड दिल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.आठवलेंचा आघाडीवर हल्लाबोलशिवशक्ती आणि भीमशक्तीला बाळासाहेबांनी नटवले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आम्ही हटवले, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर हल्ला चढविला. आठवलेंनी या वेळी सादर केलेल्या कवितांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. शिट्ट्या टाळ््यांच्या कडकडाटात कार्यकर्त्यांनी त्यांना दाद दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस