शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांनंतर आता बसपा प्रमुख मायावतींना रामदास आठवलेंची खास ऑफर

By प्रविण मरगळे | Updated: February 28, 2021 15:28 IST

Ramdas Athvale News: आठवले दोन दिवसांच्या लखनौ दौऱ्यावर आहेत, तत्पूर्वी आठवले यांनी उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा यांची भेट घेतली.

ठळक मुद्देजे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी त्यांचे पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आले पाहिजेबसपा प्रमुख बहन मायावती आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे२०२२ च्या आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत युती करेल

लखनौ – गेल्या अनेक वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा नारा दिला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते लखनौ येथे बोलत होते, या कार्यक्रमात आठवलेंनी बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) यांना थेट रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. (RPI Leader Ramdas Athvale Offer to Mayawati for join RPI Party before Uttar pradesh Assembly Elections)

आठवले दोन दिवसांच्या लखनौ दौऱ्यावर आहेत, तत्पूर्वी आठवले यांनी उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा यांची भेट घेतली. यावेळी रामदास आठवले(Ramdas Athvale) म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी त्यांचे पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. बसपा प्रमुख बहन मायावती आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. जर मायावती या रिपब्लिकन पक्षात आल्या तर त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून मी स्वतः उपाध्यक्ष होईल असं विधान आठवलेंनी केले आहे. यापूर्वीही रामदास आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनाही रिपब्लिकन ऐक्यासाठी पक्षात येण्याची ऑफर दिली होती

तसेच देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना १५ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आठवले यांनी पुन्हा एकदा केली, २०२२ च्या आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत युती करेल. जो पर्यंत राहुल गांधी काँग्रेसमध्ये आहेत तो पर्यंत काँग्रेसचे काही भले होणार नाही असा टोलाही रामदास आठवलेंनी काँग्रेसला लगावला आहे.

लखनौ येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यास रामदास आठवले यांनी संबोधित केले. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच या वेळी विधान सभा निहाय पक्ष प्रभारिंची नियुक्ती रामदास आठवले यांनी केली.आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा विजयी लहरू द्या असे आवाहन रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी रिपाइंचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता, जवाहर अशोक पांडेय, हेंसू राम, श्याम सुंदर सिंह, जितेंद्र जैसवाल, हेमंत सिंह, जय कुमार पांडे, बलविर सिंह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेmayawatiमायावतीUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी