Coronavirus: जयंत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंनाही कोरोनाची लागण

By प्रविण मरगळे | Published: February 18, 2021 03:23 PM2021-02-18T15:23:28+5:302021-02-18T15:25:27+5:30

NCP Eknath Khadse Affected from Corona: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे, सून भाजपा खासदार रक्षा खडसेंनाही कोरोनाची लागण झाली आहे.

After Jayant Patil, NCP leader Eknath Khadse also contracted coronavirus | Coronavirus: जयंत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंनाही कोरोनाची लागण

Coronavirus: जयंत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंनाही कोरोनाची लागण

Next
ठळक मुद्देमाझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहेराष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसेंनी ट्विट करून दिली माहिती कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय त्यामुळे या भागांसाठी कडक निर्बंध लागू केले जाण्याची दाट शक्यता

मुंबई – राज्यात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली असताना मागील काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे, दिवसभरात ३ हजारापेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर असतानाच आणखी एका राष्ट्रवादीला नेत्याला कोरोना झाल्याचं समजतंय. (After Jayant Patil, NCP leader Eknath Khadse got corona infection)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे(NCP Eknath Khadse) यांना कोरोनाची लागण झाली आहे, ट्विटवरून याबाबत त्यांनी माहिती दिली आहे, खडसे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे कारण नाही, गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसेंसोबत सून भाजपा खासदार रक्षा खडसे(BJP MP Raksha Khadse) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता, माझा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तरी गेल्या ८ दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोविड चाचणी करून घ्यावी, माझी प्रकृती स्थिर आहे अशी माहिती रक्षा खडसेंनी दिली आहे.

राज्यात रुग्ण वाढू नयेत म्हणून खबरदारी

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून जी खबरदारी आणि जे निर्णय घेण्याची गरज वाटेल मग ते कितीही कठोर निर्णय असले तरी ते घेतले जातील, असं स्पष्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. याशिवाय अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू असल्याचंही ते म्हणाले. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय त्यामुळे या भागांसाठी कडक निर्बंध लागू केले जाण्याची दाट शक्यता आहे.

भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना २४ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा दिलासा

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा २४ फेब्रुवारीपर्यंत कायम केला आहे. युक्तिवाद पूर्ण न झाल्याने न्यायालयाने याचिकेवर पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. भोसरी एमआयडीसीमधील तीन एकर भूखंड गैरव्यवहाराबाबत ईडीने चौकशी सुरू केली आहे. न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी ठेवत तोपर्यंत खडसे यांना दिलासा दिला

Web Title: After Jayant Patil, NCP leader Eknath Khadse also contracted coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.