शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

बीड, अहमदनगरनंतर भाजपाला मुंबईतही फटका; राजधानीत मुंडे समर्थकाचा पहिलाच राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 21:55 IST

बीड, अहमदनगर येथून अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्देप्रीतमताईला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी वा ती नाराज नाही. अन्यायाची भावना ही समर्थकांमध्ये असते.प्रीतम यांचे नाव मंत्रिपदाच्या चर्चेत होते. हीना गावित यांचेही होते. प्रीतमचे नाव योग्यच होतेदिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाच्या विस्तारासाठी आपलं आयुष्य खर्ची केले

मुंबई – केंद्रीय कॅबिनेट विस्तारात प्रीतम मुंडेंना स्थान न दिल्यानं मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यातच पंकजा मुंडे मंगळवारी नाराज कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक घेणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सगळ्यांचेच लक्ष पंकजा मुंडे यांच्या निर्णयाकडे लागले आहे. कॅबिनेट विस्तारात डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आल्यानं मुंडे समर्थक नाराज आहेत. बीड, अहमदनगर येथून अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे.

आता राजधानी मुंबईतही मुंडे समर्थकाने राजीनामा दिला आहे. भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस आदिनाथ डमाळे यांनी राजीनामा दिला आहे. डमाळे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, प्रीतमताई मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईलअशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु जाणीवपूर्वक त्यांना डावलण्यात आलं. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाच्या विस्तारासाठी आपलं आयुष्य खर्ची केले असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत तोच वारसा घेऊन पंकजाताई आणि प्रीतमताई दिवसरात्र पक्षविस्तारासाठी मेहनत घेत आहेत. या दोन्ही मुंडे भगिनींकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना सहन झालं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता मी चिटणीसपदाचा राजीनामा देत आहे असल्याचं डमाळे यांनी पत्रात म्हटलं आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

प्रीतमताईला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी वा ती नाराज नाही. अन्यायाची भावना ही समर्थकांमध्ये असते. लोकांच्या भावना बदलणे हे माझे काम नाही, ते काळानुसार होत राहील.  जनता त्यांच्या प्रेमातून नेतृत्वाची उंची तयार करते. आमचं फक्त नाव नाही, वारसा आहे, कर्तृत्व, वक्तृत्वही आहे. प्रीतम यांचे नाव मंत्रिपदाच्या चर्चेत होते. हीना गावित यांचेही होते. प्रीतमचे नाव योग्यच होते. मुंडे साहेबांची कन्या म्हणून नाही तर ती कष्टाळू, हुशार आहे, बहुजन चेहरा आहे या शब्दात पंकजा यांनी बहिणीचे कौतुक केले.

भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. जे प्रमुख व्यक्ती आहेत ते ठरवतात. अनेकांची नावे चर्चेत होती, ती न येता नवीन नावे आली. पक्षश्रेष्ठींनी नवनवीन लोकांना संधी दिली. त्यांच्यात गुण असल्याचे पक्षाला जाणवले असेल व त्यांचा फायदा पक्षाला किती झाला हे भविष्यात कळेल, असे मतही पंकजा यांनी व्यक्त केले.

पंकजा मुंडेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक घेतली. यात ११ सचिवांच्या सोशल मीडियाचा रिपोर्ट पंतप्रधान मोदींच्या हातात होता. यात २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले. कोणत्या सचिवांनी राष्ट्रीय मुद्द्यावरून मतप्रदर्शन केले याची माहिती पंतप्रधानांकडे होती. पकंजा मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीत पकंजा तुम्ही जास्त बोलता, लोकल मुद्द्यांवर खूप बोलता पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत.

लोकलपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांकडे जास्त लक्ष द्या असा सल्ला मोदींनी पंकजा मुंडेंना दिला. तसेच बीड जिल्ह्यातील एका मुस्लीम व्यक्तीनं गोशाळा बांधलीय, त्यांना केंद्राने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. या पद्मश्रींना तुम्ही जाऊन भेटला का? असा सवाल पंकजा मुंडे यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर पंकजा मुंडे काहीच बोलल्या नाहीत. लोकांशी नाळ तोडू नका असा सल्ला त्यांनी पंकजा यांना दिला.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीBeedबीड