Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 16:31 IST2021-02-13T16:24:39+5:302021-02-13T16:31:27+5:30
Aaditya Thackeray on Pooja Chavan Suicide Case: राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाही पूजा चव्हाण प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. त्यावर आदित्य ठाकरेंनीही सावध भूमिका घेतली आहे.

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
पूजा चव्हाण (Pooja Chavan) या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव समोर आल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यात याबाबत बोलताना शिवसेनेचे सर्वच नेते सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. तर अनेक जण प्रतिक्रिया देणंही टाळत आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाही पूजा चव्हाण प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. त्यावर आदित्य ठाकरेंनीही सावध भूमिका घेतली आहे. (Aaditya Thackeray on Pooja Chavan Suicide Case)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव पुढे येत आहे याबाबत आदित्य यांना विचारण्यात आलं असता त्यांनी "मला याबाबत अद्याप माहिती नाहीय. मी यावर माहिती घेऊन बोलेन", अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
इंग्रजी आलं तर जग जिंकू...असं तिला वाटायचं, पूजा चव्हाणची स्वप्न काय होती पाहा
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर जोरदार आरोप केले जात आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही रितसर पत्र लिहून याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सावध पवित्रा घेत याबाबत मुख्यमंत्री बोलतील असं म्हटलं. आता आदित्य ठाकरेंनीही माहिती घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया देत अधिक भाष्य करणं टाळलं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दरम्यान, या प्रकरणामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढत असल्यानं शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळण्याचे सक्त आदेश पक्षाकडून देण्यात आल्याचं बोललं जात आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी विरोधक आणि प्रसारमाध्यमांमधून होत असलेल्या आरोपांबाबत संजय राठोड यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच त्यांचा फोनही नॉट रिचेबल आहे. राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधल्यास अडचणीत आणखी वाढ होऊ शकते अशी शक्यता असल्यानं त्यांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आल्याचं बोललं जात आहे.