शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 18:18 IST

Ajit Pawar Umesh Patil : मोहोळमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांना नाव न घेता चांगलेच झापले. 

Ajit Pawar : "मध्ये तर कोण पठ्ठ्या म्हणला, आताचा दौरा मी रद्द केला. अरे तू कसा रद्द केला?", असे म्हणत अजित पवार यांनी पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांना नाव न घेता फैलावर घेतले. 

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा सोलापूर जिल्ह्यात आहे. मोहोळ येथे माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांनी उमेश पाटील यांचा नामोल्लेख न करता समाचार घेतला.

अजित पवार म्हणाले, "पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त महायुतीचे आमदार निवडून आले पाहिजे. माढ्याला जाणार आहे, तिथेही सांगणार आहे. त्या संदर्भात जातीचा-पातीचा, नात्याचा-गोत्याचा विचार करू नका."

"कोण पठ्ठ्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला"

"कोण कोण काय काय सांगतंय त्याचा उल्लेख मगाशी तटकरेंनी केला. मध्ये तर कोण पठ्ठ्या म्हणला, आत्ताचा दौरा मी रद्द केला. अरे तू कसा रद्द केला? अजित पवारने आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा आहे", असे म्हणत अजित पवारांनी उमेश पाटलांचे कान टोचले. 

"पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे मी दौरा पुढे ढकलला होता. पण, ते कुत्र कसं बैलगाडीखाली चालत असतं आणि त्याला वाटत मी गाडी ओढतोय. आरं पुढची बैल गाडी ओढताहेत. तू काय करतोय, तू देवळातील घंटा हलवतो?", अशा शब्दात अजित पवारांनी सुनावले.

मी दौरा रद्द करायला सांगितलेच नाही -उमेश पाटील

दरम्यान, अजित पवारांच्या विधानावर बोलताना उमेश पाटील म्हणाले की, "अजित पवारांचा दौरा रद्द करा म्हणून सांगितलेच नव्हते. या मोहोळ तालुक्याच्या अनगरकरांनी त्यांना असे सांगितले की, उमेश पाटलांनी दादाचा दौरा रद्द करायला लावला. मी कशाला दौरा रद्द करायला लावतोय. मी काही एवढा मोठा नेता नाहीये की, दादांचा दौरा रद्द करायला लावेन. माझ्या सांगण्यावरून दादा ऐकत असते, तर मी या आमदाराची उमेदवारीच रद्द करून टाकली असती."

उमेश पाटील - राजन पाटील वाद काय?

अजित पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे राजन पाटील यांनी अनगर गावात अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून घेतले. त्यानंतर मोहोळ येथील राजन पाटील विरोध गटाने याला विरोध केला. यात उमेश पाटीलही आहेत. अजित पवार दौऱ्यावर असतानाच मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या  अजित पवारांनी चांगले फैलावर घेतले.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sunil tatkareसुनील तटकरे