शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

१७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मात्र राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 6:39 AM

निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात असली, तरी नापिकी व कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकलेला नाही.

औरंगाबाद/नाशिक/नागपूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात असली, तरी नापिकी व कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकलेला नाही. निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राज्यातील तब्बल १७४ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली असून, प्रचाराच्या गलबल्यात त्याकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ मिळालेला नाही.सर्व राजकीय पक्षांचे पुढारी लोकांकडे मतांचा जोगवा मागत फिरत असताना, नापिकी, शेतमालाला मातीमोल भाव, कर्जबाजारीपणातून होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे मात्र कोणालाच देणेघेणे नसल्याची स्थिती आहे. दुष्काळाचे भीषण चटके सोसाव्या लागणाºया मराठवाड्यात ९१ शेतकºयांनी महिनाभरात मृत्यूला कवटाळले. त्यानंतर, विदर्भात ४९ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. खान्देशात १५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. बागायती पट्टा म्हणून ओळखल्या जाणाºया नाशिकमध्येही ९ शेतकºयांनी जीवन संपविले. मराठवाड्यात १ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत २२० शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. १४८ शेतकºयांना सरकारी मदत मिळाली असून, ५४ प्रकरणे अपात्र आहेत, तर १८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. १ ते ३१ मार्चपर्यंत ६९ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, मागील पंधरवड्यात सुमारे २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.राज्य सरकारने अटी-निकषात शेतकºयांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले, तर केंद्र सरकारनेही चालू वर्षापासून शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. तरीही शेतकºयांना दिलासा मिळालेला नाही. यंदा दुष्काळामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम वºहाडात अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत महिनाभरात १६ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. जानेवारीपासून अहमदनगर जिल्ह्यातील ४० शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या आहेत.>शेतकºयांचा विसरराजकारण्यांची ९८ टक्के भाषणे एकमेकांवर आरोप करणारी आहेत. या रणधुमाळीत शेतकºयांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. शेतकºयांची आत्महत्या, त्यांच्या आर्थिक प्रश्नांना बगल दिली जात आहे.- किशोर तिवारी,अध्यक्ष, वसंतराव नाईकशेती स्वावलंबन मिशन>रोजच पुलवामाराज्यात दिवसाकाठी ४३ शेतकरी आत्महत्या करीत असल्यामुळे येथे रोजच पुलवामा होतो आहे. काँग्रेसने शेतकरीविरोधात केलेले कायदे भाजपने रद्द केले नाहीत. ते दोन्ही पक्ष शेतकरी आत्महत्यांना जबाबदार आहेत. शेतकºयांचे मारेकरी हेच पक्ष आहेत, म्हणून ते तोंड लपवीत आहेत. - अमर हबीब,शेतकरी पुत्र आंदोलन

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक