पूर्ववैमानस्यातून चाकूने वार करत तरुणाचा खून; सराईत गुन्हेगाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 23:56 IST2025-12-12T23:56:46+5:302025-12-12T23:56:46+5:30
मृत शाकीब आणि संशयीतांमध्ये मागील काही दिवसांपासून भांडण सुरू होते.

पूर्ववैमानस्यातून चाकूने वार करत तरुणाचा खून; सराईत गुन्हेगाराला अटक
पिंपरी: जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एका तरुणावर चाकूने वार करत त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी संजय गांधी नगर पिंपरी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शाकीब छोटू शेख (२५, संजय गांधीनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेम प्रकाश डोंगरे (मिलिंदनगर, पिंपरी) आणि त्याच्या दोन साथीदारांनी हा गुन्हा केला असून त्यांच्या विरोधात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकीब आणि संशयीतांमध्ये मागील काही दिवसांपासून भांडण सुरू होते. शाकीब हे शुक्रवारी सायंकाळी संजय गांधी नगर पिंपरी येथे थांबले होते. त्यावेळी संशयीत दुचाकीवरून आले. त्यांनी शाकीब यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या पोटात चाकू खुपसून जखमी केले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. प्रेम डोंगरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.