पाण्याचा अंदाज न आल्याने तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यु 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 08:42 PM2019-08-27T20:42:36+5:302019-08-27T20:43:37+5:30

अमित व त्याचे दोन मित्र आज लोणावळ्यात फिरायला आले होते. तुंगार्ली धरणाच्या परिसरात फिरल्यानंतर ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता अमित याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.

Youth dies after drowning in Tungarli Dam | पाण्याचा अंदाज न आल्याने तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यु 

पाण्याचा अंदाज न आल्याने तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यु 

Next

 लोणावळा : तुंगार्ली धरणाच्या जलाशयात बुडून अमित सिंग (वय 20, रा. गढवाल, उत्तराचल प्रदेश) या युवकाचा दुदैवी मृत्यु झाला.
    अमित व त्याचे दोन मित्र आज लोणावळ्यात फिरायला आले होते. तुंगार्ली धरणाच्या परिसरात फिरल्यानंतर ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता अमित याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची माहिती समजल्यानंतर तात्काळ घटनास्थळावर पोहचलेल्या शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाचे महेश मसणे, प्रणय अंभोरे, निकीत तेलंगे, अशोक उंबरे, अंकुश महाडिक, विकास मावकर, अभिजित बोरकर , राहुल देशमुख, नामदेव अंभोरे, राजेंद्र कडू, आनंद गावडे व सुनील गायकवाड यांच्या पथकाने रोपच्या व पंजाच्या सहाय्याने अमित बुडाला असलेल्या ठिकाणी शोध घेत अवघ्या दहा मिनिटात त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

धरणाची व पाण्याची माहिती नसताना युवा पर्यटक नको ते धाडस करतात व मृत्युला कवटाळतात. अशा अनेक घटना लोणावळा व मावळ परिसरात वारंवार घडत असतानादेखिल पर्यटकांकडून चुकांची पुनरावृत्ती होत असल्याचे पहायला मिळत आहे. 

Web Title: Youth dies after drowning in Tungarli Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.