तरुणाला लाकडी दांडक्यासह सिमेंटच्या गट्टूने मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 17:32 IST2019-04-27T17:32:06+5:302019-04-27T17:32:56+5:30

तरुणाला लाकडी दांडक्याने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास कासारवाडीतील मैला शुद्धीकरण केंद्राच्या आवारात घडली.

The youth beat by cement and wooden rods | तरुणाला लाकडी दांडक्यासह सिमेंटच्या गट्टूने मारहाण 

तरुणाला लाकडी दांडक्यासह सिमेंटच्या गट्टूने मारहाण 

पिंपरी : तरुणाला लाकडी दांडक्याने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास कासारवाडीतील मैला शुद्धीकरण केंद्राच्या आवारात घडली.


या प्रकरणी राहुल वसंत थोरात (वय २४, रा. रमाबाईनगर, लिंक रोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कासारवाडीतील मैलाशुद्धीकरण केंद्राच्या आवारात गुरुवारी मध्यरात्री थोरात हे मशीन आॅपरेटींगचे काम करीत होते. त्यावेळी सहआॅपरेटर प्रकाश शेट्टी (रा. सर्व्हंट कॉटर्स, मैला शुद्धीकरण केंद्राच्या आवारात, कासारवाडी) यांचा भाऊ चेतन शेट्टी याच्या तीन मित्रांबरोबर बाहेरील लोकांचे भांडण झाले. ते पाहून थोरात हे गेटवरील वॉचमनकडे गेले. तसेच ‘तु बाहेरच्या लोकांना आतमध्ये का सोडतोस’ असे विचारणा करीत असताना चार अनोळखी व्यक्तींनी थोरात यांना लाकडी काठीने मारहाण करुन सिमेंटचे गट्टु फेकून मारले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The youth beat by cement and wooden rods