धक्कादायक! तरुणीला डांबून ठेवत केला अत्याचार, घरच्यांकडे मागितली खंडणी, हिंजवडीतील घटना
By रोशन मोरे | Updated: April 3, 2023 16:59 IST2023-04-03T16:56:28+5:302023-04-03T16:59:13+5:30
या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली...

धक्कादायक! तरुणीला डांबून ठेवत केला अत्याचार, घरच्यांकडे मागितली खंडणी, हिंजवडीतील घटना
पिंपरी : लग्नाला होकार देत नाही म्हणून तरुणी राहत असलेल्या पीजीवरून तिला जबरदस्तीने आपल्या घरी नेले. तेथे वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच तिला घरात डांबून ठेवण्यात आले. ही घटना २२ ऑक्टोबर २०२२ ते दोन एप्रिल २०२३ या कालावधीत हिंजवडी येथे घडली. या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तेजस किरण सौदाणकर (वय २४ रा. पिसोळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लग्नाला होकार देत नाही म्हणून आरोपी तिला जबरदस्तीने घरी घेऊन गेला. तेथे त्याना फिर्यादीवर वारंवार अत्याचार केला. तसेच फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या घरांच्याकडे पैश्याची मागणी केली. तसेच पैसे दिले नाही तर फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी अधिक तपास करत आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.