पूर्ववैमनस्यातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा डोळा झाला निकामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 18:42 IST2019-05-20T18:41:39+5:302019-05-20T18:42:12+5:30
पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन चौघांनी तरुणाला कमरेच्या पट्याने बेदम मारहाण केली...

पूर्ववैमनस्यातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा डोळा झाला निकामी
पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन चौघांनी तरुणाला कमरेच्या पट्याने बेदम मारहाण केली. यामध्ये डोळयावर गंभीर इजा झाल्याने तरुणाचा एक डोळा कायमस्वरुपी निकामी झाला. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
तौसिफ इक्बाल खान (वय २८, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रोहित मोटे (वय १९, रा. शनिमंदिराजवळ, संत तुकारामनगर, पिंपरी) व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संत तुकारामनगर येथील अहिल्यादेवी होळकर मैदानाजवळील त्रिदेव इंटरप्रायजेस येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास आरोपींनी त्यांची गाडी फिर्यादी तौसिफ खान यांच्या गाडीसमोर आडवी लावली. तसेच पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. चौघांनी त्यांना कमरेच्या पट्याने बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या डाव्या डोळयाला गंभीर इजा झाल्याने डावा कायमस्वरुपी निकामी झाला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.