चिखली येथे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेला तरूण बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 19:13 IST2020-05-11T19:13:15+5:302020-05-11T19:13:32+5:30

नदीत पोहण्यासाठी गेलेला तरुण मूळचा कर्नाटकाचा

A young man who went for a swim in the Indrayani river drowned at Chikhali | चिखली येथे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेला तरूण बुडाला

चिखली येथे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेला तरूण बुडाला

पिंपरी : पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. ही घटना रविवारी दुपारी चिखली येथे घडली.
चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश लिंगाप्पा नाईक (वय २५, रा. बग वस्ती, चिखली, मुळ - कर्नाटक) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. चिखली येथे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेला एक जण बुडाला असल्याची माहिती पिंपरी - चिंचवड अग्निशमन विभागाला शनिवारी रात्री उशिरा मिळाली. मात्र, रात्री अंधारामुळे शोधमोहीम राबवता आली नाही. रविवारी दुपारी जवानांनी रबरी बोटीच्या सहाय्याने चार तास शोध मोहिम राबवत गणेश नाईक यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले.

Web Title: A young man who went for a swim in the Indrayani river drowned at Chikhali