एकसारखी गाडी घेतल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 07:12 PM2020-02-28T19:12:32+5:302020-02-28T19:17:19+5:30

तू माझ्यासारखी गाडी का घेतली, असे म्हणत दमदाटी करत रोहितवर कोयत्याने वार केले. तसेच रोहित यांचा मित्र संतोष याला लोखंडी रॉडने पायावर व डोक्यात मारून जखमी केले.

The young man beaten another person due to taking same bike | एकसारखी गाडी घेतल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

एकसारखी गाडी घेतल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

googlenewsNext

पिंपरी : आपल्यासारखी गाडी घेतल्याच्या रागातून एकाने तरुणावर कोयत्याने वार केले. यात तो तरुण गंभीर जखमी झाला. पंडित चाळ, देहूरोड येथे दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला.रोहित बजरंग सकट (वय १७, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विक्की मालगे, साहिल पासवान, भरत (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्की याने काही दिवसांपूर्वी एक दुचाकी विकत घेतली. त्यानंतर त्याच रंगाची आणि कंपनीची दुचाकी फिर्यादी रोहीत यांनी देखील खरेदी केली. आपल्यासारखी दुचाकी जाणीवपूर्वक घेतल्याच्या संशयातून विक्कीला राग आला. दरम्यान, दुपारी रोहित त्यांचे मित्र संतोष अन्नामले, करण सकट, प्रेम ढिलोढ यांच्यासोबत शिवाजी विद्यालयाच्या मागे पंडित चाळ येथे गुरुवारी गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी विक्की त्याच्या दोन साथीदारांसह तेथे आला. तू माझ्यासारखी गाडी का घेतली, असे म्हणत दमदाटी करत रोहितवर कोयत्याने वार केले. तसेच रोहित यांचा मित्र संतोष याला लोखंडी रॉडने पायावर व डोक्यात मारून जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: The young man beaten another person due to taking same bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.