पिंपरी : गरबा खेळून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा चार जणांनी विनयभंग केला. ही घटना पिंपरी येथे मंगळवारी (दि. १) घडली.अक्षय तुरूकमारे, राहुल दांडे (दोघेही रा. बौद्धनगर, पिंपरी), सोनू आणि सचिन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १७ वर्षीय मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी मुलगी ही गरबा खेळून आपल्या घरी पायी जात होती. त्यावेळी मोटारीतून आलेल्या आरोपी अक्षय तुरूकमारे याने तिच्याजवळ मोटार थांबविली आणि तिला गाडीत बसण्यास सांगितले. गाडीत बसण्यास मुलीने नकार दिला असता आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. त्यानंतर आरोपीनी फिर्यादी मुलीच्या नातेवाइकांनाही मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
गरबा खेळून घरी जात असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 18:28 IST
गरबा खेळून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा चार जणांनी विनयभंग केला.
गरबा खेळून घरी जात असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग
ठळक मुद्देचौघांवर गुन्हा दाखल