पिंपळे गुरव येथील पवना नदीत तरुण बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 21:15 IST2019-07-09T21:14:39+5:302019-07-09T21:15:35+5:30

पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकालगतच्या बौध्द विहाराजवळील घाटावर त्याने नदीत उडी मारली.

The young drowned in Pavna river at pimple gurav | पिंपळे गुरव येथील पवना नदीत तरुण बुडाला

पिंपळे गुरव येथील पवना नदीत तरुण बुडाला

सांगवी : पवना नदीत उडी मारल्याने एक तरुण बुडाला. अग्निशामक दलाच्या पथकांनी शोध घेतला. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारला ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, शुभम येडे (वय २३, रा. रहाटणी, असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम हिंजवडीतील एका कंपनीत नोकरी करतो. ह्यह्यमी घरी येत आहे,ह्णह्ण असे शुभमने मंगळवारी दुपारी दोनला त्याच्या कुटुंबीयांना फोन करून सांगितले. मात्र तो घरी आलाच नाही. तो नदीत बुडाला असल्याची माहिती पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांनी दिली. 
पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकालगतच्या बौध्द विहाराजवळील घाटावर शुभम मंगळवारी दुपारी आला. तेथे त्याने नदीत उडी मारली. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच शुभमचे कुटुंबीय देखील तेथे आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सायंकाळी उशिरापर्यंत शुभमचा शोध घेतला. मात्र मिळून आला नाही. अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. बुधवारी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात येईल, असे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.

Web Title: The young drowned in Pavna river at pimple gurav