शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

‘वायसीएम’ डॉक्टरांविना सलाइनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:59 AM

पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) अपु-या मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) अपु-या मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे.तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची संख्या पुरेशी नसल्याने उपचार क रण्यासाठी विलंब होत असल्याची तक्रार रुग्ण आणि डॉक्टरांकडूनही होऊ लागली आहे. शिवाय डॉक्टरांवर कामाचा ताणही पडत आहे.शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या धर्तीवर संत तुकारामनगर येथे सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची स्थापना केली. या रुग्णालयात शहरातीलच नव्हे तर आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेडसह सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद अशा विविध भागांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात. विविध अपघातांमध्ये गंभीर जखमींना वायसीएमधील डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. हा लौैकिक ऐकून उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, महापालिकेकडून येथील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ यांची संख्या वाढवली जात नाही.महापालिकेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ओळख असलेल्या रुग्णालयातील बहुतांश डॉक्टर मानधनावर तर परिचारिका, वॉर्ड बॉय, टेक्निशियन यांसह अन्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. अपघातातील गंभीर रुग्णांना तातडीक विभागात आणले असता पुरेशे डॉक्टर नाहीत. यामुळे रुग्णांची हेळसांड होते.>शल्यचिकित्सकांची संख्या अपुरी असल्याने अनेक रुग्णांच्याशस्त्रक्रिया रखडलेल्या असतात. भुलतज्ज्ञांच्याही जागा रिक्त आहेत. आंतररुग्ण विभागात हजारो रुग्ण भरती केले जातात. या रुग्णांच्या शुश्रूषेसाठी आवश्यक असणाºया परिचारिक ा, वॉर्ड बॉय यांचीही संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.७५० खाटांच्या या रुग्णालयात अतिदक्षता विभागात ५० रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयासाठी ७३ वैैद्यकीय अधिकाºयांची आवश्यकता आहे. मात्र यापैैकी केवळ ३७ जागांवरच नियुक्त्या केल्या आहेत. रुग्णालयासाठी सुमारे ९५० लोकांचा स्टाफ असून त्यामध्ये ५९० कायम कर्मचारी, तर ४०९ कंत्राटी तसेच मानधनावर काम करत आहेत.सुरक्षा अन् सुविधांचा अभावरुग्णालयातील डॉक्टरांची अपुरी संख्या येथील उपलब्ध डॉक्टरांसाठी अधिक डोकेदुखी ठरत आहे. एखादा गंभीर इजा झालेला रुग्ण उपचारासाठी आणला असता डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्या रुग्णाच्या तपासणीसाठी बिलंब लागतो. अशा वेळी रुग्णाच्या नातेवाइकांकडून गोंधळ घातला जातो. तोडफोड केली जाते. प्रसंगी डॉक्टरांना मारहाणही केली जाते. याच कारणांमुळे काही महिन्यांपूर्वी ‘मार्ड’ने संप केला होता. सुरक्षा अन् सुविधांची येथे वानवा आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.महाविद्यालयाचा घाटडॉक्टर अन् रुग्णांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यास अद्याप महापालिकेला मुहूर्त सापडत नाही. मात्र, पालिका प्रशासनाने ‘वायसीएम’मध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा घाट घातला आहे. रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करणे गरजेचे असताना महाविद्यालयाचा हट्ट कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय महाविद्यालयासाठी डॉक्टरांच्या जागा भरण्यास पालिकेला परवडते. मग, यापूर्वी अपुºया डॉक्टरसंख्येमुळे रुग्णांची हेळसांड होताना प्रशासनाने डॉक्टरांची भरती का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.>बालरोगतज्ज्ञांची वानवाबाह्यरुग्ण विभागात दररोज हजारोंच्या संख्येने उपचारासाठी रुग्ण येत असतात. यातील बहुतांश रुग्ण मेडिसीन विभागाशी संबंधित असतात. सुमारे पाचशे रुग्ण तपासण्यासाठी मेडिसीन विभागात येतात. मात्र या विभागातील डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे डॉक्टरांवर ताण येत असून त्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन यांची संख्याही अपुरी आहे.