Pimpri Chinchwad: चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू, चऱ्होली बुद्रुकमधील घटना
By नारायण बडगुजर | Updated: October 19, 2023 18:16 IST2023-10-19T18:15:08+5:302023-10-19T18:16:07+5:30
चऱ्होली बुद्रुक येथील भोईआळी येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली....

Pimpri Chinchwad: चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू, चऱ्होली बुद्रुकमधील घटना
पिंपरी : बांधकामाच्या साईटवर चौथ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. चऱ्होली बुद्रुक येथील भोईआळी येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
शुभमकुमार जितेंद्रकुमार सिंह (२१, रा. चऱ्होली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम सुपरवायझर दीपक तापकीर (५१, रा. चऱ्होली बुद्रुक) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार रामदास चांगदेव बहिरट यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १९) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईआळी येथे वैभव क्लॉथ सेंटरच्या इमारतीच्या वरच्या बाजूला बांधकाम सुरु आहे. त्या कामावर आरोपीने कामगारांना सुरक्षा पुरवली नाही. दरम्यान, चौथ्या मजल्यावर काम करत असताना शुभमकुमार हा खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.