बसचा टायर फुटल्याने महिला प्रवासी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 17:00 IST2019-04-28T16:59:40+5:302019-04-28T17:00:57+5:30
चिंचवड येथील चापेकर चाैकात पीएमपी बसचा टायर फुटल्याने एक महिला जखमी झाली.

बसचा टायर फुटल्याने महिला प्रवासी गंभीर जखमी
चिंचवड: पुण्याहून चिंचवड कडे आलेल्या बस मधून मोठा आवाज झाला.आणि चिंचवड मधील चापेकर चौकात नागरिकांची धावाधाव सुरू झाली.कोणाला काहीच कळेना नक्क्की काय झाले याचा अंदाजही कोणाला आला नाही.बसमधून प्रचंड मोठा आवाज आल्याने प्रवासी व परिसरातील नागरिकांची घबराहाट झाली.बसच्या मागील बाजूचा टायर फुटल्याने हा आवाज आला होता.या घटनेत बसचा पत्रा फाटल्याने बस मधील एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली.सायंकाळी चार वाजता ही घटना घडली.
अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या या चौकात बस मधून अचानक मोठा आवाज आल्याने नागरिकांची धावपळ झाली. चौकात उभ्या असणारे काही टेम्पो व रिक्षा चालक बस च्या दिशेने धावले.बसचा मागील बाजूचा टायर फुटल्याने बस मधील प्रवाशांना याचा हादरा बसला.बस थांबताच प्रवासी सैरावैरा धावू लागले.या आवाजाचा हादरऱ्याने बसचा अक्षरशः पत्रा फाटला. बसच्या मागील बाजूस बसलेली एका महिला प्रवासी या घटनेत गंभीर जखमी झाली आहे.
घटनास्थळी चिंचवड पोलीस उपस्थित झाले.त्यांनी या जखमी महिलेला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे.चौकात घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली आहे.जखमी महिलेची अद्याप ओळख पटली नाही. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.