शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

....तक्रार मागे घेण्यावरून टोळक्याकडून महिलेला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 5:09 PM

पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पायी घरी जात असताना आठ जणांच्या टोळक्याने महिलेला अडवले.

पिंपरी : पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पायी घरी जात असताना आठ जणांच्या टोळक्याने महिलेला अडवले. तक्रार मागे घे म्हणून दमदाटी करत मारहाण केली. यामध्ये महिला जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास आझाद चौक निगडी येथे घडली.  अनिता नवनाथ गायकवाड (वय ५२, रा, अंकुश चौक निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबा क्षीरसागर, राहूल धोत्रे, कैलास विटकर, रुपेश क्षीरसागर, मयुर धोत्रे, शुभम क्षीरसागर, राणी कांबळे, कविता धोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता गायकवाड यांनी बाबा क्षीरसागर आणि रेखा कांबळे यांच्याविरोधात यमुनानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवून त्या मुलीसोबत पायी घरी जात होत्या. अनिता आझाद चौकामध्ये आल्या असता आरोपी रिक्षामधून आले. त्यांनी बेकायदा जमाव जमवून अनिता यांना तक्रार मागे घे म्हणत शिवीगाळ केली. तसेच अनिता यांना धक्काबुक्की करत लाथाबुक्यांनी, दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये अनिता जखमी झाल्या. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला