शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पवनाधरण दुर्घटना प्रकरण! तरुणांच्या मृत्यूप्रकरणी सुमती व्हीलाच्या मालकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 18:25 IST

व्हिलामधुन धराणाच्या बॅक वॉटरमध्ये उतरण्यासाठी रस्ता ठेवला, तसेच ठिकाणी पाण्यात उतरण्यास बंदी आहे किंवा पाण्यात उतरू नये, अशा सूचनांचे फलक लावले नाहीत

पवनानगर : मावळमधील पवना धरणात बोट उलटून दोन तरुणांचा जीव गेला. याप्रकरणी लेक व्हिव सोसायटीमधील सुमती व्हिलाच्या मालक आरती मंडलीक, बोट मालक संतोष चाळके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा पोलिसांनी कारवाई केली असली तरी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. 

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना धरण परिसरात बुधवारी तुषार अहिरे, मयूर भारसाके (दोघे मूळ रा. भुसावळ, जि. जळगाव) हे मित्रांसोबत बुधवारी फिरायला गेले होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ त्यांनी लेक एस्केप व्हिला बंगला भाड्याने घेतला होता. बंगल्याच्या आवारातूनच धरणाच्या पाणलोटात उतरण्यासाठी मार्ग आहे. तिथे पाणलोट क्षेत्रात नाव लावली होती. या नावेतून तुषार, मयूर आणि त्याचे मित्र बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फिरायला गेले. त्यानंतर मयूर भारसाके ज्या नावेत होता, ती नाव अचानक उलटली. मयूर बुडतोय, हे पाहून दुसऱ्या नावेत असणारा तुषार अहिरे त्याला वाचवायला गेला. दोघांनी पोहत बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस व शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील स्वयंसेवकांनी दोघांना बाहेर काढले. उपचारांपूर्वीच तुषार, मयूर दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेस जबाबदार सुमती व्हिलाचे मालक आहेत, अशी तक्रार मृतांच्या नातेवाईकांनी केली होती, त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

तपासात या गोष्टी आल्या पुढे 

१) दुधीवरेचे येथील व्हिलाचे मालक आरती मंडलीक या आहेत. पवना धराणाचे पाण्यात उतरण्यास मनाई आहे. मात्र, त्यांनी व्हिलामधुन धराणाच्या बॅक वॉटरमध्ये उतरण्यासाठी रस्ता ठेवला. तसेच ठिकाणी पाण्यात उतरण्यास बंदी आहे किंवा पाण्यात उतरू नये, अशा आशायांचे सुचनांचे फलक लावले नाहीत. कोणीही पाण्यात उतरणार नाही, याची काळजी घेण्यासाठी गार्ड नियुक्त केला नाही. २) व्हीला मालकाच्या निष्काळजीपणा तसेच पवना धरणाचे पाण्यात बोट चालवण्यास किंवा नेण्यास मनाई असताना नादुरुस्त अवस्थेतील बोटी (होडी) उघडयावर ठेवल्या. खबरदारी न घेता किंवा साखळदंडाने बांधल्या नाहीत, म्हणून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाDamधरणPavna Nagarपवना नगरWaterपाणीDeathमृत्यू