स्थायी समितीची सभा वेळेवरच होणार? नदीसुधारला गती द्या, स्थायीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 11:45 PM2021-03-10T23:45:55+5:302021-03-10T23:59:20+5:30

महापालिका स्थायी समितीची सभा आज झाली.  पिंपरी चिंचवड शहराकरीता भामा आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाणी पुन्हा आरक्षित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.

Will the Standing Committee meet on time? Accelerate river improvement, order of standing Committee | स्थायी समितीची सभा वेळेवरच होणार? नदीसुधारला गती द्या, स्थायीचे आदेश

स्थायी समितीची सभा वेळेवरच होणार? नदीसुधारला गती द्या, स्थायीचे आदेश

googlenewsNext

पिंपरी :  महापालिकेच्या वतीने नदीसुधार प्रकल्पाला गती द्यावी, अशा सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. स्थायी समितीची सभा वेळेनुसारच होईल, याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश द्या, अशीही सूचना केली. (Will the Standing Committee meet on time? Accelerate river improvement, order of standing Committee)

महापालिका स्थायी समितीची सभा आज झाली.  पिंपरी चिंचवड शहराकरीता भामा आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर पाणी पुन्हा आरक्षित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. या बिगर सिंचन पाणी आरक्षणापोटी सिंचन पुनर्स्थापनाचा खर्च शासनाकडे भरावा लागणार आहे. या खर्चाचा पहिला हप्ता ३५ कोटी ५५ लाख पुणे पाटबंधारे विभागास अदा केला जाणार आहे. तर आंद्रा धरणातून ३६.८७ दशलक्ष घनमीटर पाण्याचा पुनर्स्थापना खर्चाचा तिसरा हप्ता २० कोटी १६ लाख पुणे पाटबंधारे विभागास दिला जाणार आहे. याबाबतचा विषय मंजूर करण्यात आला.

महापालिकेतील स्थायी समिती सभेची वेळही विषय पत्रिकेवर असते त्यानुसार ती सुरू होत नाही, कधी अधिकारी वेळेवर येत नाहीत, तर कधी सदस्य त्यामुळे सभा वेळत होत नाही, अ‍ॅड लांडगे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी प्रशासनास सभा वेळेवर घेण्याचे निर्देश दिले. यापुढे वेळेतच सभा होईल, असे सांगण्यात आले.  

भामा आसखेडचे पाणी लवकर आणल्यास पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच महापालिकेच्या वतीने नदीसुधारचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे स्थायी समिती अध्यक्ष अ‍ॅड नितीन लांडगे यांनी म्हटले आहे.

Web Title: Will the Standing Committee meet on time? Accelerate river improvement, order of standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.