Pune: पत्नीच्या नातेवाईकांवर चाकूने वार; पतीला अटक, चाकणमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 08:38 IST2024-04-12T08:38:36+5:302024-04-12T08:38:50+5:30
चाकण येथील आंबेठाण रस्त्यावर मंगळवारी (दि. ९) ही घटना घडली...

Pune: पत्नीच्या नातेवाईकांवर चाकूने वार; पतीला अटक, चाकणमधील घटना
पिंपरी : कौटुंबिक कारणांवरून पत्नीला मारहाण करून त्रास दिला. याचा जाब विचारला म्हणून पतीने घरातील चाकूने वार करत पत्नीच्या नातेवाईक असलेल्या दोघांना जखमी केले. चाकण येथील आंबेठाण रस्त्यावर मंगळवारी (दि. ९) ही घटना घडली.
अरविंद मारुती राठोड (३३, रा. चाकण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. प्रेमसिंग महादेव जाधव (५६, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद हा त्याच्या पत्नीला कौटुंबिक कारणांवरून त्रास देत होता. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी प्रेमसिंग व त्याचे साथीदार योगेश गेले. तुम्ही कोण मला विचारणारे, असे म्हणत अरविंद याने घरातील चाकूने प्रेमसिंग यांच्या हातावर वार केले. तसेच योगेश यांच्याही हातावर वार केले. यात प्रेमसिंग आणि योगेश हे दोघेही जखमी झाले.