पत्नीचे केस कात्रीने कापून दिली कोयत्याने मारण्याची धमकी; निर्दयी पतीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 11:13 IST2021-08-05T11:12:50+5:302021-08-05T11:13:02+5:30

पिंपरीच्या भीमनगर मधील धक्कादायक प्रकार

Wife's hair cut with scissors, threatened with a scythe; Filed a crime against a ruthless husband | पत्नीचे केस कात्रीने कापून दिली कोयत्याने मारण्याची धमकी; निर्दयी पतीवर गुन्हा दाखल

पत्नीचे केस कात्रीने कापून दिली कोयत्याने मारण्याची धमकी; निर्दयी पतीवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देउजव्या हातावर दगडी पाटा मारून केले जखमी

पिंपरी : बहिणीकडे जाणाऱ्या पत्नीला जबरदस्तीने घरी घेऊन गेला. त्यानंतर तिला मारहाण करत डोक्याचे निम्मे केस कापून कोयत्याने मारून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजी मंडई समोर भीमनगर, पिंपरी येथे बुधवारी  सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

अमृता नरेंद्र वाल्हेकर (वय २३, रा. मिलिंद नगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी बुधवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे पती नरेंद्र राजू वाल्लेकर (वय २७, रा. भीमनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता या त्यांच्या आईच्या घरातून त्यांच्या बहिणीकडे पायी भाटनगरकडे जात होत्या. त्यावेळी पिंपरी पुलावर नरेंद्र हा अमृता जवळ आला. तू आपल्या घरी चल, असे म्हणाला. त्यानंतर त्याने पत्नीला घरी नेले. तेथे शिवीगाळ करून मारहाण केली. तिच्या उजव्या हातावर दगडी पाटा मारून जखमी केले. तसेच डोक्याचे निम्मे केस कात्रीने कापून कोयत्याने मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Wife's hair cut with scissors, threatened with a scythe; Filed a crime against a ruthless husband