wife crashed husbands finger | पत्नीने ठेचले पतीच्या हाताचे बाेट ; भाेसरीतील धक्कादायक प्रकार
पत्नीने ठेचले पतीच्या हाताचे बाेट ; भाेसरीतील धक्कादायक प्रकार

पिंपरी : तू घरात राहू नकोस, असे म्हणून झाडूने मारहाण करून पत्नीने रस्त्यावरील दगडाने पतीच्या हाताचे बोट ठेचले. त्यामुळे गंभीर जखम झाल्याने डॉक्टरांनी बोट कापून वेगळे केले. भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथे गुरुवारी (दि. १७) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी प्रल्हाद शंकरराव जगदाळे (वय ६५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पत्नी मंगला प्रल्हाद जगदाळे (वय ५५) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मंगला जगदाळे हिने पती प्रल्हाद जगदाळे यांना ‘‘तू घरात राहू नको असे,’’ म्हणून झाडूने व रस्त्यावरील दगडाने मारहाण केली. फिर्यादी प्रल्हाद यांच्या बोटावर मारून ते बोटाला गंभीर जखमी केले. त्यानंतर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी गेले असता तेथे डॉक्टरांनी सदर बोटाची जखम गंभीर असल्याने ते कापून वेगळे केले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.    


Web Title: wife crashed husbands finger
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.