तू इथे गाडी का लावली? भाजीपाला विक्रेत्याच्या पाठीत मारला चाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 14:49 IST2021-06-12T14:49:35+5:302021-06-12T14:49:51+5:30

तू इथे गाडी का लावली, असे म्हणून आरोपीने फिर्यादीशी वाद घालून शिवीगाळ आणि मारहाण करत पाठीत मारला चाकू

Why did you stand here your vehicle ? Knief attack on the vegetable seller | तू इथे गाडी का लावली? भाजीपाला विक्रेत्याच्या पाठीत मारला चाकू

तू इथे गाडी का लावली? भाजीपाला विक्रेत्याच्या पाठीत मारला चाकू

पिंपरी : तू इथे गाडी का लावली, असे म्हणून भाजीपाला विक्रेत्याशी वाद घालून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पाठीत चाकू मारून त्याला जखमी केले. नूर मोहल्ला, नेहरूनगर येथे गरुवारी (दि. १०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. 

चाँद बशीरखाँ पठाण (वय २८, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. ११) फिर्याद दिली. रोहण (वय २२, नेहरूनगर), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नूर मोहल्लानगर, नेहरूनगर येथे भाजीपाला विक्री करीत असताना आरोपी तेथे आला. तू इथे गाडी का लावली, असे म्हणून आरोपीने फिर्यादीशी वाद घालून शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच आरोपीने त्याच्या कमरेचा चाकू काढून फिर्यादीच्या पाठीत मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Why did you stand here your vehicle ? Knief attack on the vegetable seller