‘‘तू माझ्या घरच्यांचे फोन का उचलते?" पत्नीला बादली, लाटण्याने केली मारहाण; गुन्हा दाखल

By नारायण बडगुजर | Updated: January 23, 2024 18:09 IST2024-01-23T18:08:37+5:302024-01-23T18:09:20+5:30

मोशी प्राधिकरणात शनिवारी (दि. २०) रात्री सव्वाआठ ते रविवारी (दि. २१) सायंकाळी सात या कालावधीत ही घटना घडली....

"Why are you picking up my family's phone?" Wife was beaten with a bucket; case registered | ‘‘तू माझ्या घरच्यांचे फोन का उचलते?" पत्नीला बादली, लाटण्याने केली मारहाण; गुन्हा दाखल

‘‘तू माझ्या घरच्यांचे फोन का उचलते?" पत्नीला बादली, लाटण्याने केली मारहाण; गुन्हा दाखल

पिंपरी : तू माझ्या घरच्यांचे फोन का उचलते, असे म्हणत पतीने शिवीगाळ करत पत्नीला लाटण्याने व प्लास्टिकच्या बादलीने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मोशी प्राधिकरणात शनिवारी (दि. २०) रात्री सव्वाआठ ते रविवारी (दि. २१) सायंकाळी सात या कालावधीत ही घटना घडली. 

याप्रकरणी विवाहित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिच्या पतीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेच्या पतीच्या आईचा फोन आला. त्यामुळे विवाहिते तो फोन तिच्या पतीला दिला. तू मला फोन का दिला, माझ्या आईला माझ्या मोबाइल नंबरवर फोन करायला सांगायचे ना, तू माझ्या घरच्यांचे फोन का उचलते? असे म्हणून पती फिर्यादी महिलेवर चिडला. तिच्यावर संशय घेऊन शिवीगाळ केली.

तसेच लाटण्याने व प्लास्टिकच्या बादलीने मारहाण करून डाव्या हाताचा अंगठा पिरगळून दुखापत केली. विवाहितेला जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी महिलेचे वडील हे तिच्या पतीला समजावण्यासाठी गेले असता त्यांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना शिवीगाळ केली.

Web Title: "Why are you picking up my family's phone?" Wife was beaten with a bucket; case registered