शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पवना धरण परिसरात पर्यटकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? दोन वर्षांत गेला ११ जणांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:47 IST

दोन वर्षांत गेला ११ जणांचा जीव : प्रशासनाची टोलवाटोलवी

पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात गेल्या आठवड्यात बोट पलटी होऊन दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भिजण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक धरणात उतरतात, परंतु खोलीचा अंदाज न आल्याने बुडतात. काही जण बोटीतून पाण्यात फिरण्याची मजा लुटत असतात. मात्र बोटमालक कोणतीही सुरक्षा न देता बोटी पाण्यात फिरवतात. त्यामुळे वाऱ्याच्या व लाटेच्या तडाख्यात बोट बुडाल्याच्या घटनाही घडत आहेत.पवना धरण परिसरात २०२२ ते २०२४ दरम्यान ११ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात पाच विनाइंधन नौकांना परवानगी आहे, मात्र सुमारे १५ ते २० इंधन बोटी आणि सुमारे ६० ते ७० विनाइंधन नौका बेकायदेशीरपणे धरणाच्या पाण्यात फिरताना दिसतात. यावर जलसंपदा विभागाचे अधिकारी गप्प आहेत. धरणामध्ये इंधन बोटीला परवानगी नसताना त्या राजरोस फिरत आहेत. धरणाच्या जागेवर अतिक्रमण करून बंगलेधरण परिसरात संपादित जागेवर अनेक धनदांडग्यांनी बेकायदेशीरपणे टोलेजंग बंगले व फार्महाऊस बांधले आहेत. काही जण महिन्यातून किंवा वर्षातून एकदा वास्तव्यासाठी येत असतात. इतर वेळी हे फार्महाऊस व बंगले महिन्याकाठी काही रक्कम ठरवून भाडेतत्त्वावर दिले जात आहेत. विशेष म्हणजे याबाबत कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडे माहिती नाही. पर्यटकांची माहिती पोलिसांना न कळवता बंगले व फार्महाऊस भाड्याने दिले जातात.पोलिसांची कारवाई घटना घडल्यावरचधरण परिसरातील बंगले व फार्महाऊसवर पर्यटक भाडे देऊन राहण्यासाठी येत असतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी काही जण अमली पदार्थ, दारू, मावा यांची राजरोस विक्री करतात. यामधून एखादी दुर्घटना घडली तरच पोलिस कारवाईचे कागदी घोडे पुढे करत असतात. सुरक्षारक्षक करतात काय?परिसरात सुमारे २२ सुरक्षारक्षक आहेत. गेल्या वर्षभरात जलसंपदा विभागाने नवीन सुरक्षारक्षक घेतले असून त्यांच्यासमोर राजरोस चालणाऱ्या उद्योगांकडे दुर्लक्ष होत आहे. 

डिसेंबर महिना सुरू झाला की धरण परिसरात पर्यटक येत असतात. परिसरात अनधिकृत बोटिंग मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्याकडे जॅकेट अथवा कोणत्याही सुरक्षा उपाययोजना नसतात. त्यामुळेच धरणात दरवर्षी पर्यटकांचा बुडून मृत्यू होत असतो. बोटमालकांनी पर्यटकांना सर्व सुविधा पुरवून बोट क्लब चालवावेत, नाही तर बंद करावेत. - नीलेश गराडे, संस्थापक, वन्यजीव रक्षक, मावळजलसंपदा विभाग अथवा पोलिसांकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. घटना घडल्यानंतर फक्त पंधरा दिवस कठोर नियम लावले जातात. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. - दत्तात्रय काजळे, माहिती अधिकार कार्यकर्ते बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बोटी व नौका यामधील आठ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले असून, जलसंपदा विभागाला पत्रव्यवहार केला आहे. बेकायदेशीर बोटी व नौकाचालकांची नावे द्या, कारवाई करू. - किशोर धुमाळ, पोलिस निरीक्षक, लोणावळा बेकायदेशीर व्यवसायांवर आमच्या विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे. मालमत्ता जप्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी असल्याने ते दूषित होऊ नये याची काळजी घ्यावी. - श्वेता कुराडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी