शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

जन्मदात्या आईनेच फेकले पोटच्या गोळ्याला विहिरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:51 PM

जन्मदाती आईनेच पोटच्या गोळ्याला विहिरीत फेकून दिल्याची घटना लोणावळ्यातील पांगोळी गावात शुक्रवारी पहाटे घडली आहे. शंभू दत्तात्रय भांगरे असे या बालकाचे नाव आहे.

लोणावळा, दि. 15 - जन्मदाती आईनेच पोटच्या गोळ्याला विहिरीत फेकून दिल्याची घटना लोणावळ्यातील पांगोळी गावात शुक्रवारी पहाटे घडली आहे. शंभू दत्तात्रय भांगरे असे या बालकाचे नाव आहे.      पांगोळी गावात राहणार्‍या शितल तिकोणे हीचे दिड वर्षापुर्वी उर्से गावातील दत्तात्रय भांगरे यांच्याशी लग्न झाले होते. नुकतेच आठवडाभरापुर्वी शितल ही माहेरी आईकडे आली होती. आज शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शितल हिने पोटचा गोळा असलेल्या शंभूला अचानक घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत फेकले. सकाळच्या सुमारास बाळाचे बाळूते पाण्यावर तरंगताना मिळून आले. याबाबत पांगोळी ग्रामस्त, लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग मित्र या रेस्कू टिमने विहिर तसेच गावाचा परिसर शोधून काढला मात्र दिवसभर बाळाचा शोध लागला नाही. अखेर आयएनएस शिवाजीच्या पाणबुड्याने सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास बाळाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.   शितलने पोटच्या गोळ्याला पाण्यात का फेकले याचे कारण स्पष्ट झाले नसून याप्रकरणी बाळाचे शव विच्छेदन झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा