जलवाहिनी फुटल्याने पिंपळेगुरव, दापाेडीतील पाणीपुरवठा विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 16:32 IST2018-12-01T16:31:16+5:302018-12-01T16:32:43+5:30
पिंपळेसौदागर पुलाजवळ चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी फुटल्याने गळती सुरु झाली आहे. दुरुस्तीसाठी पाणी बंद केले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडी या पूर्ण भागाचा आणि नव्या सांगवीच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

जलवाहिनी फुटल्याने पिंपळेगुरव, दापाेडीतील पाणीपुरवठा विस्कळीत
पिंपरी : पिंपळेसौदागर पुलाजवळ चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी फुटल्याने गळती सुरु झाली आहे. दुरुस्तीसाठी पाणी बंद केले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडी या पूर्ण भागाचा आणि नव्या सांगवीच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागात सायंकाळी पाणी येणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी दिली.
पिंपळेसौदागर पुलाजवळील चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी सकाळी फुटली. त्यामुळे पाण्याची गळती सुरु झाली होती. याबाबत पाणीुपरवठा विभागास माहिती मिळाल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जलवाहिनीचे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडीच्या पूर्ण भागाचा व नव्या सांगवीच्या काही भागाचा आज दुपार व संध्याकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. दुरूस्तीनंतर या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. पाणी पुरवठा ज्या भागात होणार नाही, त्या नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पाणी कपातीचे संकट
शहरात कोणत्याही भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. अशातच जलसंपदा विभागाने ४८० एमएलडी ऐवजी ४४० एमएलडी पाणी उचलावे, अशी सूचना केली आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट शहरावर असणार आहे. दिवसाआड पाणीपुरवठा की आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवायचा यावर विचारमंथन सुरू आहे. त्यामुळे पाणीकपातीवर पुढील आठवड्यात चर्चा होऊन निर्णय होणार आहे. त्यामुळे पाणी कपात होणार असल्याने शहरवासियांमध्ये नाराजीचा सूर आहे.