पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 14:02 IST2024-01-16T14:01:28+5:302024-01-16T14:02:17+5:30
शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे....

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील पाणीपुरवठा विभागाच्या अशुद्ध जल उपसा केंद्र, रावेत आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेंतर्गत यंत्रणेची आवश्यक देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.
रावेत येथील जल उपसा केंद्र गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा दिनांक १८ जानेवारीचा सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले आहे.