पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते जलप्रदूषण आणि काही भागांत पिण्याच्या पाण्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याच्या तपासणीसाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार मे. मोनेरा लॅब या संस्थेकडे पिण्याच्या पाण्यासह शहरातील नद्यांच्या पाण्याची तपासणी करण्याचे काम देण्यात आले आहे. शहरात पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीनही नद्यांमधील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे अहवालांतून समोर आले आहे. नाले, औद्योगिक सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी या नद्यांमध्ये मिसळत असल्याने पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या नद्यांमध्ये प्रदूषण वाढल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा प्रामुख्याने पवना आणि आंद्रा धरणांतून केला जातो. पवना धरणातील पाणी रावेत येथून तर आंद्रा धरणातील पाणी निघोजे येथून उचलले जाते. हे पाणी प्रक्रिया करून नागरिकांना पुरवले जात असले, तरी शहरातील अनेक ठिकाणी पाणीवाहिन्यांमध्ये गळती होत असल्याने सांडपाणी किंवा ड्रेनेजमध्ये पाण्याचे मिश्रण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तपासणी करणे आवश्यक झाले आहे.
स्थायी समितीकडे मंजुरीसाठी प्रस्तावदोन निविदा प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये मे. मोनेरा लॅब या संस्थेची निविदा तुलनात्मकदृष्ट्या वाजवी आढळली. २८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या तुलनेत सुमारे २६.२० टक्के कमी दराने ही निविदा सादर केली आहे. त्यामुळे या संस्थेकडून सुमारे २१ लाख ६ हजार ६२१ रुपयांपर्यंतचे काम करून घेण्याचा प्रस्ताव स्थायीकडे मंजुरीसाठी पाठविला.
या संस्थेमार्फत शहरातील पिण्याच्या पाण्याचे तसेच पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमधील पाण्याचे नमुने तपासले जाणार आहेत. या तपासणीमुळे नद्यांमधील प्रदूषणाची अचूक स्थिती समोर येण्यास आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता अधिक प्रभावीपणे तपासण्यास मदत होणार आहे. - अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता, महापालिका
Web Summary : Rising water pollution prompts Pimpri-Chinchwad Municipal Corporation to appoint a third-party for water testing. Rivers face industrial waste contamination. The initiative aims to improve drinking water quality and assess river pollution effectively.
Web Summary : जल प्रदूषण बढ़ने पर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ने जल परीक्षण के लिए एक बाहरी एजेंसी नियुक्त की। नदियों में औद्योगिक कचरा मिल रहा है। इसका उद्देश्य पेयजल गुणवत्ता में सुधार और नदी प्रदूषण का आकलन करना है।