पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 13:16 IST2019-03-07T13:15:33+5:302019-03-07T13:16:03+5:30

भाजपचे बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे मडिगेरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे यांच्यावर ८ मतांनी मात करत विजय मिळविला.

Vilas Madigheri selected as Standing Committee Chairman of Pimpri Municipal Corporation | पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड 

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड 

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे मडिगेरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे यांच्यावर ८ मतांनी मात करत विजय मिळविला.मयूर कलाटे यांना ४ तर मडिगेरी यांना १२ मते मिळाली. शिदे माघार घेणार आणि मडिगेरी सभापती होणार याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते.
स्थायी समिती सभापतीपदासाठी गुरुवारी (दि. ७मार्च) निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी कामकाज पाहिले. स्थायी समितीत दहा भाजप, चार राष्ट्रवादी काँग्रेस, एक शिवसेना आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल असून अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. त्यामुळे मडिगेरी यांचा विजय निश्चित होता. परंतु, भाजपच्याच शीतल शिंदे यांनी बंडखोरी केल्याने निवडणूक कमालीची रंगतदार अवस्थेत होती. शिंदे यांनी माघार घेतल्याने मडिगेरी यांचा विजय सुकर झाला.

Web Title: Vilas Madigheri selected as Standing Committee Chairman of Pimpri Municipal Corporation